Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड कानातून रक्तस्त्राव होतानाही ऐश्वर्याने गाण्यासाठी केलं शूट, एकापेक्षा एक ठुमके लावत जिंकली लाखो मनं

कानातून रक्तस्त्राव होतानाही ऐश्वर्याने गाण्यासाठी केलं शूट, एकापेक्षा एक ठुमके लावत जिंकली लाखो मनं

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. ती जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त तिने हॉलिवूड चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. आज जरी ऐश्वर्या कमी चित्रपटांमध्ये दिसत असली, तरी एकेकाळी ती प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाची पहिली पसंती होती. आज आपण तिच्याबद्दल तो किस्सा जाणून घेणार आहोत जो ऐकून तुमच्याही डोक्यात पाणी येईल.

तुम्हाला ‘देवदास’ चित्रपट आठवत असेलच. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांनी या चित्रपटात केवळ उत्कृष्ट अभिनयच केला नाही, तर डान्समध्येही धमाकेदार भर घातली. ‘डोला रे डोला’ असो वा ‘मार डाला’ या गाण्यावर दोन्ही अभिनेत्रींनी डान्समध्ये कोणतीही कसर सोडली नाही. सततच्या डान्समुळे दोन्ही अभिनेत्रींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. ऐश्वर्याच्या कानातूनही रक्तस्राव होऊ लागला.


कानातून वाहत होते रक्त
ऐश्वर्या आणि माधुरीचे ‘डोला रे डोला’ हे गाणे प्रचंड गाजले होते. आजही प्रेक्षक या गाण्यावर नाचताना दिसतात. या चित्रपटात ऐश्वर्याने ‘पारो’ची भूमिका साकारली होती. या गाण्यासाठी दोन्ही अभिनेत्रींना जड दागिने घालून डान्स करावा लागला. डान्सदरम्यान ऐश्वर्याने कानात जड झुमके घातले होते. कानातले पडल्यामुळे ऐश्वर्याच्या कानात रक्तस्राव होऊ लागला. एवढे होऊनही तिने न थांबता डान्स पूर्ण केला.

कोणालाच नव्हते माहिती
ऐश्वर्याचा कान सतत दुखत होता. मात्र मोठ्या कानातल्यांमुळे तिचे कान खराब झाले असून कानातून रक्तस्त्राव सुरू झाल्याचे तिने क्रू मेंबर्सला कळू दिले नाही. शूटिंग संपल्यानंतर लोकांना याची माहिती मिळाली.

माधुरीने घातला होता ३० किलोचा लेहेंगा
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात सर्व काही भव्य होते. ‘देवदास’च्या ‘काहे छेडे मोहे’ गाण्यासाठी माधुरीच्या लेहेंग्याचे वजन ३० किलो होते. एवढा भारी लेहेंगा घालून डान्स करणे माधुरीसाठी सोपे नव्हते. या लेहेंग्याची किंमत १५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

प्रेग्नंट होती माधुरी
‘काहे छेडे मोहे’ हे गाणे सादर करताना माधुरी दीक्षितलाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान ती प्रेग्नंट होती. असे असूनही तीही जड लेहेंगा घालून डान्स करत होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-
हॉटेलमध्ये केलेली ‘ती’ चूक इतकी महागात पडली की विश्वसुंदरी सोडून गेली, विवेक- ऐश्वर्याच्या ब्रेकअपचा गाजलेला किस्सा
जेव्हा ब्रेकअपच्या अनेेक वर्षांनंतर एकमेंकासमोर आले होते ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय; वाचा तो किस्सा

हे देखील वाचा