Friday, December 8, 2023

जेव्हा ब्रेकअपच्या अनेेक वर्षांनंतर एकमेंकासमोर आले होते ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय; वाचा तो किस्सा

ऐश्वर्या राय  ही बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिचे सौंदर्य आणि निळेशार डोळे बघून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. परंतु ऐश्वर्यासोबत लग्न करून अभिषेक बच्चनने लाखोंचे हृदय तोडले आहेत. ते दोघेही आज सुखी संसार करत आहे. परंतु एक काळ असा होता जेव्हा तिचे नाव सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत जोडले गेले होते. विवेक ओबेरॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये जवळीक वाढली आणि त्या दोघांनी लग्न केले. ब्रेकअपनंतर असे अनेक प्रसंग आले होते जेव्हा विवेक आणि ऐश्वर्या एकमेकांच्या समोर आले होते.

ऐश्वर्या एका पारितोषिक सोहळ्याला गेलो होती. तिथे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये ऐश्वर्या ही अमिताभ बच्चन यांच्यासोबत बसली होती. सगळं काही ठीक ठाक चाललं होतं. ऐश्वर्या त्या सोहळ्याचा आनंद घेत होती. पण जेव्हा विवेक ओबेरॉयच नावं पुकारण्यात आले आणि तो जेव्हा मंचावर गेला, तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचे हसू उडाले.

ऐश्वर्या सगळं काही विसरून तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. पण विवेकने असे मध्येच तिच्या समोर येऊन तिचे प्रॉब्लेम्स वाढवले होते. तेव्हा ती तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्या लाईनमध्ये बसली होती. त्यामुळे तिला विवेक ओबेरॉयसोबत नजर मिळवताना अडचणी येत होत्या.

सूत्रांच्या माहितीनुसार, विवेक जेवढा वेळ मंचावर होता, तेवढा वेळ ऐश्वर्या इकडे तिकडे बघत होती. या दरम्यान ती कधी अमिताभ बच्चन यांच्यासोबत बोलत होती, तर कधी मनीष मल्होत्रासोबत. या प्रसंगाला तोंड देणे तिच्यासाठी खूपच अवघड होते. पण जेव्हा विवेक स्टेजवरून खाली उतरला, तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला.

सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत नात्यात होती. या दोघांच्याही अफेअरची चर्चा खूपच पसरली होती. परंतु विवेक ओबेरॉयने पत्रकार परिषदेत सलमान खानबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा ऐश्वर्या त्याच्यापासून खूप लांब गेली. त्यानंतर तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. ते दोघेही आज सुखात आहे. त्यांना आराध्या नावाची एक गोड मुलगी देखील आहे.

हेही नक्की वाचा-
42व्या वर्षी शमा सिकंदरने मोनोकिनी परिधान करून घातला धुमाकूळ, नेटकरी म्हणाले, ‘व्वा एकदम …’
अक्षय कुमारच्या आईची भुमिका साकारल्याचा अभिनेत्री शेफालीला होतोय पश्चाताप?, म्हणाली, ‘आता मी…’

हे देखील वाचा