Saturday, July 6, 2024

भोजपुरी स्टारवर भारी पडला आकांक्षा दुबेचा ठुमका, पाहणारे पाहतच राहिले

भोजपुरी संगीतक्षेत्रातील सुपरस्टार गायक सध्या श्रावण महिन्याच्या निमित्ताने नवनवीन गाणी घेऊन येत आहेत. मात्र, काही कलाकार हे वेगवेगळी गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे समर सिंग होय. समर सिंग घेऊन आलेले हे गाणे इतर गायकांच्या गाण्यांपेक्षाही वेगळे आहे. नुकतेच त्याचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे शिवभक्तीशी संबंधित नाहीये, तसेच कावड यात्रेशीही संबंधित नाहीये. त्याचे गाणे ग्रामीण भागातील गोष्टी दाखवत आहे.

समर सिंग (Samar Singh) याच्या नवीन गाण्याचे नाव ‘ना करे जाईब रोपनिया’ (Na Kare Jaib Ropaniya) असे आहे. या गाण्यात समर एका शेतकऱ्याच्या भूमिकेत आहे. तसेच, यामध्ये त्याने लुंगी परिधान केल्याचे दिसत आहे. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) दिसत आहे. व्हिडिओत दोघांमध्ये क्यूट अशी केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

हे गाणे ३० जुलै, २०२२ रोजी समर सिंग याच्या अधिकृत युट्यूब अकाऊंटवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला एका दिवसाच्या आतच दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ७ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.

भातशेतीजवळ चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात अभिनेत्री आकांक्षाचा डान्स आणि तिचे एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. ज्या व्यक्तीला भोजपुरी समजते, तो या गाण्याची मजा घेतल्याशिवाय राहणार नाही. या गाण्याला समर सिंग आणि शिल्पी राज यांनी आपला आवाज दिला आहे. तसेच, आकांक्षा दुबे हिच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याचे लिरिक्स गोलू यादव यांनी लिहिले आहेत. तसेच, अभय बाबा यांनी गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी सनी डबलू यांनी केली आहे. तसेच, गाण्याचे दिग्दर्शक आशिष सत्यार्थी आहेत.

यापूर्वी समर सिंग याचे ‘देवघर चली लेकर अपाची’ (Devghar Chali Leke Apachi) हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणेही समरच्याच अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनेत्री शिवानी सिंग दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
सलमान खानच्या जीवाला धोका? गन लायसन आणि आता बुलेटप्रूफ गाडीची व्यवस्था
अजय देवगणसमोरच डायरेक्टरने केलेला सैफचा बाजार, एका चापटीत चारलेली धूळ
अगं बाबो ! आपल्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसे सलमान खान तर बिग बॉसमधून कमावतो

हे देखील वाचा