भोजपुरी सिनेसृष्टीतील अनेक गाणी सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये आता आणखी एका गाण्याचा समावेश झाला आहे. हे गाणे भोजपुरीचा देसी स्टार समर सिंग याचे आहे. त्याचे कोणतेही गाणे प्रदर्शित होताच व्हायरल होऊ लागते. त्याच्या देसी अंदाजाला प्रेक्षकांची जबरदस्त पसंती मिळते. अशातच त्याचे नुकतेच प्रदर्शित झालेले रॅप गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, हे गाणे फक्त ३ दिवसात व्हायरल झाले आहे.
समर सिंग (Samar Singh) याच्या व्हायरल होणाऱ्या गाण्याचे नाव ‘काला काला चष्मा’ (Kala Kala Chashma) असे आहे. हे गाणे ३ दिवसात व्हायरल झाले आहे. याची क्रेझ मुंबईच्या बसपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या बसमध्ये समर सिंगच्या या गाण्याचे पोस्टर दिसले. तसेच, दुसरीकडे रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या डिस्प्लेवरही त्याचे गाणे एकदा नाही, तर अनेकदा वाजताना दिसले. अशाप्रकारे या गाण्याची मुंबईत जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, समर सिंगचा चाहतावर्ग फक्त यूपी आणि बिहारमध्येच नाही, तर मुंबईसारख्या शहरातही आहे. त्याचे चाहते भारतभर असून त्याच्या गाण्यांना पसंती दर्शवत असतात.
समरच्या गाण्याबाबत बोलायचं झालं, तर हे गाणे समर सिंग याच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर १ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला ४ दिवसातच आतापर्यंत ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, या गाण्याला समर सिंगसोबत रेणुका पंवार (Renuka Panwar) हिने आपला आवाज दिला आहे. दुसरीकडे, ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक क्रिती वर्मा हिच्यावर हे गाणे चित्रीत केले गेले आहे. या गाण्याचे बोल शेखर मधुर आणि कुंज बिहारी यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे संगीत दिग्दर्शक साजन मिश्रा आहेत. तसेच, गाण्याचे दिग्दर्शक पुनीत एस बेदी आणि मोहिद मिद्धा हे आहेत. याव्यतिरिक्त कोरिओग्राफर हे सुमित आहेत.