Thursday, November 21, 2024
Home भोजपूरी अय्यो भारीच ना! अक्षरा सिंगने चक्क लूंगीमध्ये धरला ठेका, पाहायला मिळाली झारखंड-बिहारच्या मैत्रिणींची खास बॉन्डिंग

अय्यो भारीच ना! अक्षरा सिंगने चक्क लूंगीमध्ये धरला ठेका, पाहायला मिळाली झारखंड-बिहारच्या मैत्रिणींची खास बॉन्डिंग 

अक्षरा सिंग (Akshara Singh) ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अक्षराने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर फिल्मी दुनियेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षरा केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर एक उत्तम गायिका देखील आहे. या अभिनेत्रीने तिच्या मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये एक स्थान मिळवले आणि आज तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अक्षरा सतत तिच्या म्युझिक व्हिडिओंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते आणि सध्या तिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

‘अरबी कुथू’ गाण्यावर झारखंड-बिहारच्या मैत्रिणींची दाखवली खास बॉन्डिंग
अक्षराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कोरिओग्राफर अलिशासोबत तेलुगु चित्रपट बीस्टमधील ‘अरबी कुथू’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या गाण्यातील दोघांच्या मूव्ह्जचे खूप कौतुक होत असून, त्यांची ड्रेसिंग स्टाईलही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडिओ पोस्ट करत अक्षराने लिहिले की, “जेव्हा बिहार झारखंडला भेटेल… तेव्हा गर्दा डान्स तर बनतोच ना बॉस…” याद्वारे ती शेजारच्या दोन राज्यांतील दोन खास मैत्रिणींच्या बाँडिंगबद्दल सांगत आहे. या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे.

अक्षराने ‘अरबी कुथू’ गाण्यावर केला डान्स
‘अरबी कुथू’ च्या मूळ व्हर्जनमध्ये मास्टर फेम थलापथी विजय आहे. जो एक तमिळ सुपरस्टार आहे आणि त्याच्यावर चित्रित केलेले हे गाणे काही दिवसांपासून ट्रेंडमध्ये आहे. अनेक सेलिब्रिटींनी यावर आपाल्या मूव्ह्ज दाखवल्या असून, आता या यादीत अक्षरा आणि तिची कोरिओग्राफर अलिसा यांचे नावही सामील झाले आहे. यावरून हे देखील स्पष्ट होते की, अक्षरा गायिका असण्यासोबतच डायनॅमिक डान्सर देखील आहे. व्हिडिओमध्ये लूंगी आणि काळा चष्मा घातलेले दोन्ही सेलिब्रिटी अप्रतिम दिसत आहेत.

अक्षराचे ‘मिठा रंग’ गाणे होतय व्हायरल
डान्स व्यतिरिक्त अक्षरा सिंगचे एक भोजपुरी होळी गाणे देखील खूप पसंत केले जात आहे. ज्यामध्ये ती खेसारी लाल यादवसोबत दिसत आहे. खेसारी म्युझिक वर्ल्ड वरून प्रदर्शित झालेल्या ‘मीठा रंग’ गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. भोजपुरी सिनेसृष्टीतील हिट मशीन म्हटल्या जाणार्‍या खेसारी लाल यादव यांच्या या गाण्याला खूप पसंती मिळत आहे आणि अभिनेत्रीची स्टाईलही खूप पसंत केली जात आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अभिनेत्रीला अनेकवेळा सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा