Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

सोज्वळ ‘पाठक बाईं’चा साडीतील ग्लॅमरस अंदाज! पाहाच अक्षया देवधरचे भुरळ पाडणारे फोटो

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही प्रसिद्ध मालिका संपून बरेच दिवस झाले आहेत. मात्र, त्यातील पात्र अजूनही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप प्रेम दिले. सोबतच ‘राणा दा’ आणि ‘पाठक बाईं’ची लोकप्रियताही शिगेला पोहोचली. पाठक बाई अर्थातच अक्षया देवधर या मालिकेद्वारे घराघरात पोहोचली. पण टीव्हीवर साधी- सोज्वळ दिसणारी अंजली, खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती सतत आपले वेगवेगळे लूक्स चाहत्यांसमोर सादर करत असते.

अलीकडेच लाडक्या पाठक बाईंनी इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने शिमरी साडीसह, बोल्ड असा ब्लाऊज परिधान केलेला दिसला. सोबतच चोकर नेकलेस घालून केलेला गडद मेकअप अक्षयाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पुरेसा होता.

अक्षयाने साडी परिधान करून फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या अगोदरही तिने बऱ्याचदा साडीमध्ये चाहत्यांना भुरळ पाडली आहे. पूर्वीच्या या फोटोमध्ये अक्षयाचा पारंपारिक अंदाज मनाला वेड लावणारा आहे. पारंपारिक लूकसह कपाळावरील चंद्रकोर पाहून कोणीही सहजपणे तिच्या प्रेमात पडेल. चाहतेही तिच्या फोटोंना भरभरून प्रेम देण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. फोटोखाली कमेंट्स करून चाहत्यांनी आपले प्रेम व्यक्त केलेले पाहायला मिळाले.

अक्षयाने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे रंगमंचावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदापर्ण केले होते. पण ‘तुझ्यात जीव रंगला’ मध्ये अंजली पाठकची भूमिका साकारत तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.

मालिकेतील अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची प्रेमकथा बरीच गाजली. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर, दोन्ही कलाकार आता सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आयुष्यात मित्र कमी आणि ट्रोलर्सच जास्त भरले आहेत’, म्हणत शालूची आपल्याच फोटोवर कमेंट

-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर

-व्वा… अतिसुंदर! दानिश मोहम्मदने ‘इंडियन आयडल १२’ शोच्या सेटवरच साजरी केली ईद, कोरोना निघून जाण्यासाठीही केली प्रार्थना

हे देखील वाचा