Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड बाबो! पोटात बुक्क्या मारत राहिला व्यक्ती, सहन न झाल्याने अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल

बाबो! पोटात बुक्क्या मारत राहिला व्यक्ती, सहन न झाल्याने अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल

सोशल मीडियावर दरदिवशी कलाकार त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. कलाकारांच्या प्रत्येक व्हिडिओला चाहते भरभरून प्रेम देतात. त्यांचे काही व्हिडिओ असे असतात, ज्याने प्रेक्षकांच्याही भुवया उंचावतात. बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी हिची लेक अलाया एफ सोशल मीडियावर ग्लॅमरसचा तडका लावत असते. ती फॅशनपासून ते फिटनेसपर्यंत सर्व टिप्स तिच्या चाहत्यांना देते. अशात तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच धक्का दिला आहे.

काय आहे व्हिडिओत?
या व्हिडिओत अलाया एफ (Alaya F) एका जिममध्ये दिसतेय. तिच्यासोबत एक व्यक्तीदेखील दिसतोय, जो तिचा ट्रेनर असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, तो व्यक्ती तिच्या पोटावर बुक्क्या मारताना दिसत आहे. आधी अलाया सरळ उभी राहते आणि तो व्यक्ती तिला बुक्क्या मारत राहतो. मात्र, शेवटी अलाया ते सर्व सहन होत नाही आणि ती ‘आता बास’ म्हणून त्या व्यक्तीला थांबवते. अलायाची ही ट्रेनिंग पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. तसेच, सर्वजण तिच्या कौतुकाचे पूल बांधत आहेत. अलायाने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर शेअर केला आहे.

या सिनेमात झळकणार अलाया
अलायाच्या खात्यात सध्या अनेक सिनेमे आहेत. ती ‘यू-टर्न’ सिनेमात झळकणार आहे. याव्यतिरिक्त ती कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्यासोबत ‘फ्रेडी’ या सिनेमातही दिसणार आहे. विशेष म्हणजे, अलाया ही पहिल्यांदाच कार्तिकसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. काही काळापूर्वीच तिने तिच्या या सिनेमाची शूटिंग पूर्ण केली होती. अलायाचा ‘फ्रेडी’ हा एक रोमँटिक थ्रिलर सिनेमा आहे, ज्याची निर्मिती एकता कपूरने केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक शशांक घोष हे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALAYA F (@alayaf)

अलाया हिच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘जवानी जानेमन’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. या सिनेमात अलायाने अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री तब्बू (Tabu) यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र, या सिनेमाला फार कमाल दाखवता आली नव्हती. असे असले, तरीही अलायाने तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALAYA F (@alayaf)

दिग्गज कलाकार करतात फॉलो
अलायाच्या चाहत्यावर्गाबद्दल बोलायचं झालं, तर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते. तिला इंस्टाग्रामवर १२ लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. यामध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या कलाकारांचाही समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘ही लज्जास्पद गोष्ट…’, पंतप्रधानांचा फोटो शेअर करत शिवसेनेच्या महिला खासदारांनी व्यक्त केला संताप; काय आहे प्रकरण
पार्वती मातेची भूमिका साकारत असताना स्टेजवरच आला मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
‘चित्रपट प्रदर्शित करण्याची हिच योग्य वेळ..’, आलिया भट्टने बॉयकॉट ट्रेंडवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा