बॉलिवूड कलाकारांचे कधीही न पाहिलेले फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. हे फोटो समोर येताच व्हायरल होतात. अनेक कलाकार देखील त्यांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ओळखण्यासाठी कोड्यात पाडतात. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. जे तुफान व्हायरल होत असतात. नुकताच तिच्या बालपणीचा एक फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अभिनेते परेश रावल यांच्यासोबत दिसत आहे.
फोटोमध्ये ती पडद्यावर तयार केलेल्या कारसोबत स्टूलवर बसलेली दिसत आहे. आलियाचे हे बालपणीचे फोटो अभिनेत्री पूजा भट्टने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. पूजाने आलियाचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती अभिनेते परेश रावल यांच्यासोबत बसून पोझ देत आहे. दुसऱ्या फोटोत अभिनेते हसत आहेत आणि ते तिच्या मागे उभे आहेत.
या फोटोंमध्ये छोट्या आलियाने जांभळ्या रंगाचा लेहंगा- चोली परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे, तर तिथे अभिनेते ब्लॅक अँड व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. यासोबतच चाहते कमेंट करून तिच्या क्यूटनेसचे कौतुक करत आहेत. तिच्या या फोटोंना १८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
आलिया सध्या रणबीर कपूरला डेट करत असल्यामुळे चर्चेत आहे. दोघांना अनेकदा एकत्र हँगआउट करताना आणि एकत्र वेळ घालवताना पाहिले जाते. त्याचवेळी, दोघांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर अनेक बातम्या येत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, रणबीर आणि आलिया यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकू शकतात.
दुसरीकडे, तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘बाहुबली’ दिग्दर्शक एसएस राजा मौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यासोबत सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एफआयआर दाखल केल्याची माहिती देताना कंगनाने शेअर केला तिचा बोल्ड फोटो
-बॉलिवूडची सर्वात यशस्वी स्क्रिप्ट रायटरची जोडी ‘सलीम – जावेद’ तुटली तरी कशी, जाणून घ्या