Monday, May 20, 2024

समुद्र किनाऱ्यावरील आलिया भट्टचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नीना गुप्ता म्हणाल्या…

बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींमध्ये आलिया भट्टची गणना केली जाते. कमी वयात आणि खूप कमी दिवसांत आलियाने स्वत:ची एक नवी ओळख निर्माण केली आहे. तसेच तिला चांगल्या अभिनयासाठी ओळखले जाते. ‘बबली गर्ल’ आलिया सर्वांनाच तिच्या अभिनयाने आणि लुक्सने नेहमीच घायाळ करत असते. आलिया सोशल मीडिआवर सक्रिय असते.

आलिया भट्ट (Alia Bhatt) आता तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसात दिली आहे. तिचे हे गाणं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘तुम क्या मिले’ हे नुकतेच रिलीज झालेले गाणे आहे. जे श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांनी गायले आहे.

या गाण्यात आलिया भट्टने रणवीर सिंगसोबत केलेल्या रोमान्समुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या गाण्याला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. दरम्यान, आलिया भट्टने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडिओ शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आधी डोंगरदऱ्यात आणि आता समुद्रकिनारी… आपण पुढे जात राहू…” या व्हिडिओमध्ये आलिया समृद्रातील पाण्यासोबत खेळताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

आलियाच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नीना गुप्ता यांनी लिहिले की, “लव्हली” तसेच हार्ट इमोजी देखील त्यांनी शेअर केल्या आहेत. सोनी राजदान आणि मनीष मल्होत्रा ​​यांनी रेड हार्ट इमोजी शेअर करत आलियाच्या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दुसरीकडे, आलियाच्या अनेक चाहत्यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Actress Alia Bhatt dancing on the beach in the song ‘Tum Kya Mile’)

अधिक वाचा- 
‘चंद्रमुखी 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज; कंगना रणौतची पोस्ट व्हायरल
बोल्ड आणि बिंधास्त! जान्हवी कपूरचे हॉट फोटो व्हायरल

हे देखील वाचा