Tuesday, May 28, 2024

‘चंद्रमुखी 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज; कंगना रणौतची पोस्ट व्हायरल

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला इंडस्ट्रीत ‘पंगा क्विन‘ म्हणून ओळखले जाते. ती नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असते. तिने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत एक विषेश स्थान निर्माण केले आहे. कंगनाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यादरम्यान कंगनाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

कंगना (Kangana Ranaut) अनेकदा सोशल मीडियावर विविध विषयावर तिचे मत मांडत पोस्ट शेअर करते. कधी नेटकरी तिचे समर्थन करताना दिसतात. तर कधी तिला प्रचंड ट्रोल देखील केल जात. कंगना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे ती सतत चर्चेत येते.

अभिनेत्री कंगना तामिळ चित्रपट ‘चंद्रमुखी 2’ (‘Chandramukhi 2’) मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2005 च्या चंद्रमुखी या क्लासिक हॉरर कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल आहे. आता पुन्हा तिने तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘चंद्रमुखी 2’ ची घोषणा केली आहे. कंगनाने अलीकडेच तिच्या नवीनतम पोस्टमध्ये ‘चंद्रमुखी 2’ रिलीज करण्याची घोषणा केली आहे.

कंगना राणौतने चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करताना लिहिले की, ‘ती या सप्टेंबरमध्ये परत येत आहे… तुम्ही तयार आहात का?’ तिचा चित्रपट ‘चंद्रमुखी 2’ या सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीच्या विशेष मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. कंगनाच्या या पोस्टमुळे तिचे चाहते खूप खूश झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

पी. ​​वासू दिग्दर्शित या चित्रपटात राघव लॉरेन्स मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच कंगना या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय ती ‘चंद्रमुखी 2’ चा देखील एक भाग आहे. (Actress Kangana Ranaut’s ‘Chandramukhi 2’ will release on the special occasion of Ganesh Chaturthi)

अधिक वाचा- 
बोल्ड आणि बिंधास्त! जान्हवी कपूरचे हॉट फोटो व्हायरल
HAPPY BIRTHDAY | वयाच्या 14 व्या वर्षी केली करिअरला सुरुवात, आता इतका बदललाय अविका गौरचा लूक

हे देखील वाचा