Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड रणबीरशी लग्न करून ४ महिने होताच, आलिया घेणार ‘हा’ मोठा निर्णय; कशी असेल सासूबाईंची रिऍक्शन?

रणबीरशी लग्न करून ४ महिने होताच, आलिया घेणार ‘हा’ मोठा निर्णय; कशी असेल सासूबाईंची रिऍक्शन?

सध्या काही सिनेमे वगळता बॉलिवूड इंडस्ट्रीतील सिनेमे एकापाठोपाठ एक असे फ्लॉप होत आहेत. मात्र, यावर्षीच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला ‘गंगुबाई काठियावाडी‘ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमाने जवळपास २०० कोटींची कमाई केली. हा महिला केंद्रित सिनेमा होता. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिने मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमा आलियाच्या कारकीर्दीतील सर्वात हिट सिनेमांपैकी एक होता. आलियाने तिच्या कारकीर्दीच्या शिखरावर आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दोन महिन्यांनंतरच आलियाने रणबीर कपूर याच्यासोबत संसार थाटला. आता दोघेही लवकरच आई-बाबा बनणार आहेत.

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी १४ एप्रिल, २०२२ रोजी संसार थाटला. लग्नानंतरच असे म्हटले जात आहे की, आलिया तिचे नाव बदलून आलिया भट्ट कपूर (Alia Bhatt Kapoor) करेल. जसे प्रियांका चोप्राने तिचे नाव बदलून प्रियांका चोप्रा जोनास आणि बिपाशा बासू हिने बिपाशा बासू ग्रोव्हर केले आहे. आता माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आलियाने म्हटले आहे की, ती लवकरच तिचे नाव बदलणार आहे. एका रिपोर्टनुसार, आलियाचे नाव बदलून आलिया भट्ट कपूर किंवा आलिया कपूर भट्ट असे ठेवले जाईल. बदललेले नाव हे तिच्या सर्व कागदपत्रांमध्येही बदलले जाईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

आलियाच्या हवाल्याने सांगण्यात आले की, “आता आम्ही लवकरच आई-बाबा बनणार आहोत. कपूर कुटुंबाशी नातं जोडल्यानंतर, मला भट्ट बनून राहायचे नाही. तुम्हाला समजतंय ना मला काय म्हणायचंय? मला एकटेपणाची जाणीव करायची नाहीये.” आलियाने हे स्पष्ट केले आहे की, सिनेमाच्या क्रेडिटमध्येही तिचे नाव आलिया भट्ट हेच राहणार आहे.

आलियाने हे मान्य केले की, पासपोर्टमध्ये तिचे नाव आणि वैवाहिक स्थिती बदलण्यासाठी तिला अद्याप वेळ मिळाला नाहीये. तसेच, रणबीरने आनंदाने त्याच्या पासपोर्टमध्ये पत्नीचा कॉलम अपडेट केला आहे. विशेष म्हणजे, ९ सप्टेंबर रोजी आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दोघेही पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खाणाऱ्या सिनेमांवर स्पष्टच बोलला अक्षय कुमार; म्हणाला, ‘सगळी चूक माझीच’
श्रद्धाचे मनमोहक फोटो पाहून बोल्ड अभिनेत्रींनाही जाल विसरून, खूपच सुंदर दिसतेय ‘चिरकुट’
बॉलिवूडवर शोककळा! ब्लॉकबस्टर सिनेमे बनवणाऱ्या निर्मात्याचं निधन, सुनेने दिली महत्त्वाची माहिती

हे देखील वाचा