सध्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये ज्या अभिनेत्रीची सर्वाधिक चर्चा होत आहे. ती अभिनेत्री इतर कोणी नसून खुद्द कपूर खानदानाची लाडकी सून आलिया भट्ट ही आहे. आलिया हिने नुकतीच तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली. त्यानंतर आलियाची आई सोनी राजदान लवकर आजीबाई बनणार असल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आलिया आणि रणबीर कपूर यांना त्यांच्या येणाऱ्या मुलासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता त्यांनी एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतील काही सीन्स हे आलियाच्या सिनेमातील आहेत. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी असे काही कॅप्शन दिले आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडिओत काय आहे खास?
सोनी राजदान (Soni Razdan) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला हा व्हिडिओ फक्त १३ सेकंदांचा आहे. मात्र, या १३ सेकंदाच्या व्हिडिओत सोनी राजदान यांनी साकारलेल्या काही पात्रांची झलकही पाहायला मिळत आहे. तसेच, काही झलक या आलियाच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमातील आहेत. हे दोन्ही व्हिडिओ एडिट करून आलियाच्या एका फॅन क्लबने असा व्हिडिओ तयार केला आहे, जो पाहून असे दिसते की, या दोन्ही अभिनेत्री एकच आहेत.
खास कॅप्शनसह शेअर केला व्हिडिओ
सोनी राजदान यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा शानदार व्हिडिओ पाहून मी खूप खुश आहे. वेळ काढून हा व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आलिया भट्ट एडिट्स… तुम्ही खूप हुशार आहात.”
View this post on Instagram
कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करताच कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. ‘मिर्झापूर’मध्ये स्वीटी पात्र साकारणारी मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) हिने कमेंट केली की, “खूप सुंदर.” दुसरीकडे, प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सेठ शाह हिने कमेंट केली की, “हे लय भारी आहे.”
आलिया भट्ट हिच्या प्रेग्नंसीची पोस्ट
आलिया भट्ट हिने २७ जून रोजी आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. सोनी यांनी यासोबत कॅप्शनमध्ये “कृतज्ञता, तुमचा वारसा पुढे चालू द्या.” असे लिहिले होते.
View this post on Instagram
सोनी राजदान यांचे सिनेमे
सोनी राजदान यांच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत ५०हून अधिक सिनेमात काम केले आहे. त्यात ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘सारांश’, ‘सडक’, ‘स्वयम’, ‘सर’, ‘गुमराह’, ‘गुनाह’, ‘पटियाला हाऊस’, ‘शूटआऊट ऍट वडाला’, ‘वॉर’ यांसारख्या सुपरहिट सिनेमात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
थेट इंटरनेटवर लीक झाली होती अभिनेत्रीची ‘ती’ न्यूड क्लिप, घरातून बाहेर निघायचीही झालेली बोंब
प्रसिद्ध दिग्दर्शक हरपला! ब्लॉकबस्टर ‘बालिका वधू’ सिनेमाची निर्मिती करणारे मजूमदार काळाच्या पडद्याआड
प्लेबॅक सिंगर नाही, तर वेगळंच होतं जावेद अलीचं स्वप्न, खास व्यक्ती गमावल्याने बदलले नाव










