Friday, July 5, 2024

साऱ्या जगाच्या शुभेच्छा एकीकडं अन् सूनबाईंच्या शुभेच्छा दुसरीकडं, आलियाने बनवला नीतूंचा वाढदिवस खास

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची आई आणि प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर यांच्यासाठी हा खास दिवस आहे. कारण, नीतू शुक्रवारी (दि. ०८ जुलै) त्यांचा ६४वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्याच तत्त्वांनुसार जगणाऱ्या नीतू या सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांना गुरुवारी रात्रीपासूनच वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा मिळत आहेत. चाहत्यांपासून ते जवळच्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण नीतू कपूर यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत आहेत. मात्र, या सर्वांमध्ये एका व्यक्तीच्या शुभेच्छा त्यांच्यासाठी खास आहेत. ती व्यक्ती म्हणजे त्यांची सून आणि अभिनेत्री आलिया भट्ट होय. आलियाने आपल्या सासूबाईंना खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आलियाकडून सासूबाईंना खास अंदाजात शुभेच्छा
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने सासूबाई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत नीतू कपूर हळदी समारंभानंतर आलियाच्या कपाळावर किस करताना दिसत आहेत.

आलिया भट्टने हा फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्वात सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा… माझ्या सासूबाई, मित्र, लवकरच आजीबाई, माझं तुमच्यावर प्रेम आहे.” हा फोटो नीतू यांनी त्यांच्या प्रोफाईलवर शेअर करत “माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे”, असं लिहिले आहे.

लंडनमध्ये आहेत नीतू कपूर
मागील काही दिवसांपूर्वीच नीतू कपूर या लंडनला रवाना झाल्या होत्या. त्यांनी आपला ६४ वा वाढदिवसही लंडनमध्येच साजरा केला आहे. लंडनमध्ये नीतू त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिच्यासोबत आहेत. तसेच, त्यांनी आपल्या मुलीसोबत रात्री उशिरा जोरदार सेलिब्रेशन केले.

Alia-Bhatt
Photo Courtesy: Instagram/aliaabhatt & neetu54

नीतू कपूर यांच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर त्या नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘जुग जुग जिओ’ या सिनेमात झळकल्या आहेत. याव्यतिरिक्त त्या ‘डान्स दीवाने ज्युनिअर्स’ या शोमध्येही धमाल करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

चांदण्याच्या राती जंगलाच्या मध्यभागी रणबीरने केले होते आलियाला प्रपोज, अशी आहे ‘रणबेलिया’ची लव्हस्टोरी

प्रसाद ओकच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धर्मवीर’मधील भूमिकेसाठी ‘हा’ मोठा पुरस्कार प्रदान

कपूर खानदानाचा ‘तो’ नियम मोडण्यासाठी नीतू यांना लागली होती २६ वर्षे, २१व्या वयात थाटलेला संसार

हे देखील वाचा