आलिया भट्ट ही खूप कमी कालावधीत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. तिचे चाहते फक्त भारतातच नाहीत, तर जगभरात आहेत. तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आलिया तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यामुळेही चाहत्यांमध्ये तुफान प्रसिद्ध आहे. नटखट मुलीची भूमिका असो किंवा डॅशिंग मुलीची भूमिका, आलिया प्रत्येक पात्रात स्वत:ला फिट बसवून घेते. त्यामुळेच तिचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाल करतात. तिने तिच्या कारकीर्दीची सुरुवात १९ वर्षांच्या वयात करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमातून केली होती.
आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (Student of The Year) या सिनेमातून चांगली ओळख मिळाली होती. आता तिला इंडस्ट्रीत १० वर्षे झाले आहेत. या १० वर्षात तिने चांगला पैसा कमावला आहे. मात्र, तिला पहिल्या सिनेमासाठी किती मानधन मिळाले होते, याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.
खरं तर, आलियाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, तिला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमासाठी किती रुपये मिळाले होते. आलियाने सांगितल्यानुसार, तिला तिच्या पहिल्या सिनेमासाठी १५ लाख रुपयांचा चेक मिळाला होता. हा चेक तिने तिची आई सोनी राजदान यांच्या हातात सोपवला होता.
View this post on Instagram
आलियाने सांगितले की, “मी माझा पहिला चेक आईच्या हातात दिला होता. तेव्हापासून माझा पैशांचा व्यवहार आईच सांभाळत आहे. मला नाही माहिती की, माझ्या अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत. हे खरंय की, एकूण रक्कम खूप जास्त असेल. मात्र, किती असेल, हे मला नाही माहिती. माझ्या टीमने मला नेहमीच सांगितले आहे की, तुला बसून पैसे किती आहेत याचा आढावा घेतला पाहिजे. आता मी एका मुलाची आई बनणार आहे, तेव्हा मी यावरच नजर ठेवेल.” आलियाने याचाही खुलासा केला की, ती बिल्कुल पैसे खर्च करत नाही.
आलियाच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमात वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही भूमिका होत्या. तिन्ही कलाकारांनी याच सिनेमातून पदार्पण केले होते. दुसरीकडे, आलियाकडे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत. ती ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ आणि ‘जी ले जरा’ यांसारख्या सिनेमात दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड सिनेमातही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लिपस्टिकला हात लावल्यामुळे भडकली हिना, शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला जोरात वाजवली कानाखाली
बापरे! कॉमेडियन भारती सिंगने सर्वांसमोर केले दाक्षिणात्य अभिनेत्याला किस, व्हिडिओ तुफान व्हायरल
काय सांगता! हॉलिवूडच्या ‘या’ जोडीने एकाच महिन्यात केले दुसऱ्यांदा लग्न