Saturday, June 29, 2024

आलिया भट्टने उघड केली रणबीर कपूरची सुपर पॉवर, राग येण्याच्या प्रश्नावर पाहा काय म्हणाली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हा हे दोन्ही कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तेलुगू ‘बिग बॉस ५’ च्या मंचावर गेले, तेव्हा त्यांच्यात खूप चर्चा झाली. प्रमोशन दरम्यान रणबीर आलियासाठी असे काही बोलला की, तिथे उपस्थित सर्वजण हसू लागले.

रणबीर (Ranbir Kapoor) आणि आलिया (Alia Bhatt) तेलुगू ‘बिग बॉस ५’ च्या ग्रँड फिनालेमध्ये (Telugu Bigg boss 5 Grand Finale) अयान मुखर्जी आणि एसएस राजामौलीसह पोहोचले होते. शोचे होस्ट, नागार्जुन अक्किनेनी यांनी सर्वांचे भव्य पद्धतीने स्वागत केले आणि त्यानंतर शो दरम्यान लांबलचक चर्चा सुरू झाली. आलियाने संभाषणादरम्यान रणबीरच्या सुपर पॉवरबद्दल सांगितले.

आलिया म्हणते रणबीर आहे शांत स्वभावाचा
आलियाला जेव्हा रणबीरबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने सांगितले की, “रणबीर खूप शांत स्वभावाचा आहे. ही त्याची महाशक्ती आहे.” अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा ती नाराज असते, तेव्हा रणबीर तिला शांत होण्याचा सल्ला देतो. व्हिडिओमध्ये आलिया रणबीरबद्दल बोलताना रोमँटिक दिसत आहे, जणू तिला अभिनेत्याबद्दल बरेच काही सांगायचे आहे.

रणबीर आलियाला म्हणाला ‘फायर क्रॅकर’
रणबीरने आलियाच्या स्वभावाबाबतही सांगितले की, ती पर्यावरणपूरक फायर क्रॅकर आहे. तिची तुलना तो विविध प्रकारच्या फटाक्यांशी करतो. त्याच्या शांत स्वभावाचे कारण सांगताना रणबीर म्हणतो, “जेव्हा आलिया आजूबाजूला असते, तेव्हा शांत राहावे लागते. कारण तिला राग येत राहतो.”

चाहते पाहतायेत आलिया आणि रणबीरच्या लग्नाची वाट
आलिया आणि रणबीर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा एकत्र सुट्टीवर जातात. या जोडप्याचे चाहते आता फक्त त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. रणबीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर कोव्हिड-१९ महामारी आली नसती, तर त्यांनी लग्न केले असते.

हेही वाचा-

हे देखील वाचा