Wednesday, July 3, 2024

बाबो! अक्षरापासून ते मोनालिसापर्यंत ‘या’ भोजपुरी अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेतात बक्कळ मानधन; पाहा यादी

प्रेक्षक आपल्या मनोरंजनासाठी सिनेसृष्टीतील सर्वच गोष्टी पाहणे पसंत करतात. अशात कोरोना महामारीमुळे अनेक व्यक्ती घरात बसून कंटाळले होते. यादरम्यान आपली मनोरंजनाची भूक भागवण्यासाठी बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त प्रेक्षक हे टॉलिवूड व हॉलिवूडकडे वळू लागले. एवढंच नाही, तर अनेकांनी भोजपुरी चित्रपट पाहण्यास देखील सुरुवात केली.

भोजपुरी भाषेतील ड्रामा आणि मसालेदार कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय व डान्स प्रेक्षकांना भोजपुरी चित्रपटांकडे खेचत आहे. रवी किशन, निरहुआ, मनोज तिवारी, खेसारी लाल यादव, पवन सिंग या व अशा अनेक भोजपुरी अभिनेत्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. भोजपुरी अभिनेत्यांप्रमाणे आता भोजपुरी अभिनेत्रीदेखील लाखो प्रेक्षकांची मने जिंकून लागल्या आहेत. इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवणाऱ्या अभिनेत्री लाखोंच्या घरात मानधन घेतात. चला तर मग जाणून घेऊया भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप ५ अभिनेत्रींबद्दल…

१. आम्रपाली दुबे
भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात महागडी अभिनेत्री आम्रपाली दुबे आहे. ती आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी २५ ते ३० लाख रुपये मानधन घेते. आपल्या अभिनयाचा प्रवास छोट्या मालिकांपासून सुरू केलेली ही अभिनेत्री आता सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणते. दिनेश लाल यादव उर्फ निरहुआबरोबर आम्रपालीने लगातार हिट चित्रपट केले आहेत.

https://www.instagram.com/p/CP7yMy4hB2k/?utm_source=ig_web_copy_link

२. राणी चटर्जी
भोजपुरी चित्रपटांमध्ये लाखोंच्या घरात मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये राणी चटर्जीचा दुसरा नंबर लागतो. राणी चॅटर्जी आपल्या एका चित्रपटासाठी २० ते २५ लाख रुपये मानधन घेते. विशेष म्हणजे राणी चटर्जी हिरोशिवाय देखील चित्रपट हिट करते. ‘ससुरा बडा पैसा वाला है’ या चित्रपटापासून राणी चटर्जीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

३. काजल राघवानी
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर काजल राघवानी प्रत्येक चित्रपटासाठी २५ ते ३० लाख रुपये मानधन घेते. तिचा सुपरहिट चित्रपट ‘लिट्टी चोखा’ मधील गाणी प्रेक्षकांना फार आवडतात. भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव आणि काजल राघवानी या दोघांची जोडी सुपरहिट मानली जाते.

४. अक्षरा सिंग
आपल्या अभिनयाबरोबरच दिलखेच डान्सने अक्षरा सिंगने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती आपल्या चित्रपटासाठी १५ ते २० लाख रुपये मानधन घेते. अभिनेता पवन सिंग आणि खेसारी लाल यादव या दोन भोजपुरी अभिनेत्यांबरोबर अक्षरा सिंगची जोडी प्रेक्षकांना फार आवडते.

५. मोनालिसा
मोनालिसा आपल्या एका चित्रपटासाठी १५ ते २० लाख रुपये मानधन घेते. अभिनेत्री मोनालिसाला भोजपुरी तसेच इतर भाषेतील प्रेक्षकही ओळखतात. आपल्या अभिनयापेक्षा जास्त अदाकारीने व डान्सने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

भोजपुरी चित्रपटांमधील या पाचही अभिनेत्री आपल्या अभिनयाबरोबरच डान्स व अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. आपल्या घायाळ अदाकारीने त्या बॉलिवूडमधील अभिनेत्री यांनाही टक्कर देऊ पाहतायत. या सर्वांमध्ये आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की, या अभिनेत्र्यांचे चाहते फक्त भोजपुरी नाही, तर संपूर्ण देशभरात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध गायक अदनान सामी चार वेळा चढला होता बोहल्यावर; पाकिस्तानात जन्मूनही ‘अशाप्रकारे’ मिळाले भारतीय नागरिकत्व

-स्वातंत्र्यदिन विशेष!! जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी

-बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

हे देखील वाचा