Saturday, July 27, 2024

Republic Day 2024 | जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक मोठमोठे संघर्ष करावे लागले, तेव्हा कुठे भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. या आजच्या दिवशी अर्थातच 15 ऑगस्ट रोजी आपण आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. तर दुसरीकडे पाकिस्तान काल म्हणजेच 14ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. भारताला आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळून आज 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर देखील या दोन्ही देशांमधील वैर मात्र कायम आहे. असे म्हणतात की, चित्रपट हा देशांना जोडण्याचे काम करतो. अनेक भारतीय चित्रपट देश-विदेशात चांगलेच पसंत केले जातात. मात्र भारतातील बहुतांश चित्रपट, विशेषत: देशभक्तीशी संबंधित चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात येते. पाकिस्तानमध्ये अनेक भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. स्वातंत्र्यादिनाच्या या खास प्रसंगी, आज आपण या लेखामधून जाणून घेऊ की, कोणते भारतीय चित्रपट आहेत? ज्यावर पाकिस्तानात बंदी आहे.

मुल्क
अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘मुल्क’ या चित्रपटाला त्यांच्या देशात प्रदर्शित होण्यापूर्वीच पाकिस्तानच्या सेन्सर बोर्डाने बंदी घातली होती. या चित्रपटात एका मुस्लिम कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना दहशतवादी असल्याच्या संशयावरून अटक करण्यात येते. बनारसच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ज्यात ऋषी कपूर यांनी वकील मुराद अली मोहम्मद, तर तापसी पन्नूने वकील आरती म्हणून भूमिका साकारल्या आहेत. (Independence Day Special !!! These are the films that have been banned by Pakistan)

राझी
हा चित्रपट रिलीझ झाल्यावर खूप हिट झाला होता. त्याने बॉक्स ऑफिसवर सुमारे 100 कोटींची कमाई केली होती. पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानच्या सेन्सर बोर्डाने म्हटले होते की, “या चित्रपटात अनेक वादग्रस्त आशय आहेत, ज्यात पाकिस्तानची नकारात्मक प्रतिमा दाखवण्यात आली आहे.” या चित्रपटात आलिया भट्टला गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात पाठवले जाते, असे दाखवण्यात आले आहे. जिथून ती भारताला गुप्त माहिती देते. या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत.

फँटम
हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पाकिस्तानी दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा दहशतवादी हाफिज सईदवर आधारित आहे. पाकिस्तानमध्ये याही चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटात सैफ अली खान आणि कॅटरिना कैफ हे मुख्य भूमिकेत आहेत.

नाम शबाना
साल 2015 मध्ये रिलीझ झालेल्या या चित्रपटाने बरीच लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटात तापसी बॉक्सर आणि गुप्तहेरच्या भूमिकेत दिसून आली. या चित्रपटात तापसी पन्नू, अक्षय कुमार आणि मनोज बाजपेयी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटावरही पाकिस्तानच्या सेन्सर बोर्डाने बंदी घातली आहे.

बेबी

हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. ‘बेबी’ चित्रपटात एका भ्याड दहशतवाद्याला पकडण्याच्या मोहिमेवर असलेल्या एका भारतीय गुप्तहेरची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला रिलीझ होण्यापूर्वीच पाकिस्तानच्या सेन्सर बोर्डाने बंदी घातली होती. ‘बेबी’ चित्रपटात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली आहे.

अधिक वाचा- 
चाळिशीत अभिनेत्रीचा हॉट अंदाज आला समोर, साडीतील ‘हे’ फोटो वेधतायत लक्ष
‘मंडप’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज; अभिनेत्री म्हणाली, ‘परिणाम आजही मुलींना भोगावे लागता पण…

हे देखील वाचा