Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अर्रर्र! अभिनेत्री अनन्या पांडेची गाडी मुंबई पोलिसांकडून लॉक; अभिनेत्रीच्या बॉडीगार्डने…

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे सध्या आपल्या ‘गेहराइयां’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. सिनेमात तिच्यासोबत दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि ध्यैर्य करवा हे मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. प्रेक्षक तिच्या सुंदरतेचं कौतुक करत आहेत. अशातच आता अनन्याला एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागला आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) अनन्याची गाडी लॉक केली होती.

माध्यमांतील वृत्तांनुसार, शुक्रवारी अनन्याची गाडी मुंबई पोलिसांनी लॉक केली होती. अनन्या मुंबईतील एका स्टुडिओमध्ये शूटिंग करत होती आणि तिची कार बाहेर उभी होती, जी मुंबई पोलिसांनी लॉक केली होती. अनन्याच्या कारसह अनेक गाड्या तिथे उभ्या होत्या. अनन्याने जिथे गाडी पार्क केली होती, तिथे पार्किंगची जागा नव्हती. मात्र, स्टुडिओचे साहित्य ठेवण्यासाठी जागा बुक करण्यात आली होती.

मात्र, अनन्याच्या सुरक्षा रक्षक टीमने पोलिसांशी बोलून प्रकरण मिटवले आणि काही वेळातच गाडी सोडण्यात आली. ‘गेहराइयां’साठी अनन्याचे कौतुक होत आहे. शकुन बत्रा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली आणि ‘गेहराइयां’मधील टियाच्या भूमिकेबद्दल लिहिले.

अनन्यानं साकारली टियाची भूमिका
अनन्याने आपल्या नोटमध्ये लिहिले की, “टियाचे अनेक मूड. ते साकारणे एका ट्रीटप्रमाणे होते. तिची निरागसता, संयम, असुरक्षितता, परिपक्वता, प्रेम, मन तुटणे हे सर्व नेहमीच माझ्यासोबत असेल.”

‘गेहराइयां’ची कथा दीपिकाच्या अलिशा या पात्राभोवती फिरते, ज्याचे करणसोबत सहा वर्षांचे नाते असते. तिची चुलत बहीण टिया होणारा पती झैनशी तिचे अफेअर असते. झैनची भूमिका अभिनेता सिद्धांतने साकारली आहे.

हेही पाहा- यूट्यूबवर राज्य करणारी भारतातील पोरं, ‘या’ यूट्यूबर्सचा नाद करायचा न्हाय 1

अनन्या पांडेचे आगामी सिनेमे
आता अनन्या पांडे ‘लायगर’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम अभिनेता विजय देवरकोंडा याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होत आहे. याशिवाय अनन्या पुन्हा एकदा सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘खो गये हम कहाँ’ या सिनेमातही दिसणार आहे. त्यात आदर्श गौरवही आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा