×

माधुरी दीक्षितचा खुलासा; ‘या’ कारणामुळे बुरखा घालून जावं लागलं होतं चित्रपटगृहात

‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही नेहमीच तिच्या अदाकारीमुळे चर्चेत असते. ९०च्या दशकात माधुरीने प्रत्येक चाहत्याच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. माधुरी तिच्या ‘द फेम गेम’ या नवीन वेबसीरिजमु़ळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. ती तिच्या आगामी वेब सीरिजसाठी ‘द कपिल शर्मा शो‘च्या पुढील एपिसोडमध्ये ‘द फेम गेम’च्या पूर्ण कास्टसोबत येणार आहे. यात ती सर्वांसोबत मजा मस्ती करताना दिसेल. यासोबतच ती तिच्या आयुष्यातील अनेक किस्सेही शेअर करताना दिसणार आहे.

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिलेल्या मुलाखतीत माधुरीने एक खुलासा केला आहे. ती सांगते की, तेजाब चित्रपटामधील ‘एक-दो-तीन’ हे गाणे बघण्यासाठी ती लपून चि़त्रपटगृहात पोहचली होती. प्रेक्षकांचे हावभाव जाणून घेण्यासाठी ती चि़त्रपटगृहात पोहचली होती. तेथे लोकांना कळू नये, म्हणून ती बुरखा परिधान करून बसली होती. ‘एक-दो-तीन’ गाणे वाजले की, प्रेक्षकांनी पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केला. माधुरी पुढे सांगते की, ती पहिल्या ओळीत बसली होती त्यामुळे लोकांनी फेकलेल्या पैश्यांचा वर्षाव तिच्यावर होत होता.

माधुरी दीक्षितने कपिल शर्माच्या शोमध्ये खूप मजेशीर किस्से सांगितले. ती सांगते की, तिच्या घरातला स्विचबोर्ड बिघडला होता, तर त्याला नीट करण्यासाठी चार माणसे तिच्या घरी आले होते.

माधुरी दीक्षितने सांगितले की, सुरूवातीला तर त्या व्यक्तीने कोणता बोर्ड खराब झाला आहे, असं विचारलं. तर तिने त्यांना बोर्ड दाखवला. बोर्ड ठिक झाल्यानंतर त्यातील तीन व्यक्ती जातात. पण एक व्यक्ती तेथेच थांबलेला असतो. ती त्या व्यक्तीला विचारते, तुम्हाला नाही जायचं का त्यांच्यासोबत? तेव्हा तो म्हणतो, मी त्यांच्यासोबत नाही तुम्हाला बघण्यासाठी आलो होतो. माधुरी दीक्षितचा (Mahuri Dixit New Web Series) हा किस्सा ऐकल्यानंतर लोक जोरजोरात हसायला लागतात.

हेही वाचा-

Latest Post