Wednesday, March 22, 2023

हद्दच झाली राव! ‘अनन्या’ पुन्हा पोहोचली ट्राेलर्सच्या पत्त्यावर; चाहते म्हणाले, ‘इतके टाइट कपडे…’

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे अभिनयापेक्षा जास्त तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. अलीकडेच तिचा आर्यन खानसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये किंग खानची प्रेयसी अभिनेत्रीकडे दुर्लक्ष करताना दिसत होती. नुकतेच, आता अनन्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही युजर अभिनेत्रीला ट्राेल करत आहेत, तर चाहते अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. 

अनन्या पांडे(Ananya Panday)नुकतीच मुंबईच्या ब्रॅंडा भागात स्पॉट झाली होती. यादरम्यान तिने पॅपराजीला पोज दिली. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावेळी अनन्याने गुलाबी रंगाचा लोअर, पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घालून केसवर बांधले होते. मेकअप न करताही अनन्या पांडे खूप सुंदर दिसत आहे. हातात झोला बॅग आणि पायात साधी चप्पल घालून अनन्या पांडे तिच्या गाडीकडे निघाली होती. मात्र, तिच्या या साध्या लूकमध्येही लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल केले आहे.

सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून यूजरने तिच्या कपड्यांवर कमेंट करत म्हटले, “इतके टाइट कपडे घालून श्वास कसा घेतेस.” मात्र, अनेकांना अनन्याचा साधेपणाही खूप आवडला. अनन्याचे चाहते तिच्या या लूकवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अनन्या आयुष्मान खुरानासोबत दिसनार ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटात
अनन्याच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाले, तर अनन्या शेवटची साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत ‘लिगर’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या आशा होत्या. मात्र, विजय आणि अनन्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटातही लोकांनी तिला तिच्या अभिनयामुळे ट्रोल केले होते. याव्यतिरिक्त अनन्या पांडे आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अनन्याच्या चाहत्यांना तिच्या या चित्रपटाकडून खूप आशा आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एक प्रसिद्ध विनोदवीराचे निधन; भावूक होत सुनील पाल म्हणाले…
असं काय घडलं की, ‘केबीसी 14’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांना अश्रू झाले अनावर

हे देखील वाचा