Wednesday, March 22, 2023

राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एक प्रसिद्ध विनोदवीराचे निधन; भावूक होत सुनील पाल म्हणाले…

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर आता कलाविश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या विनोदाने लोकांना हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन पराग कंसारा आता या जगात नाहीत. त्यांच्या निधनाची बातमी चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का आहे. पराग हे ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या सीझनमध्ये दिसले होते. या शोमध्ये त्यांचा पार्टनर असलेल्या सुनील पालने ही माहिती लोकांना दिली आहे.

इंस्टाग्रामवर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर करत कॉमेडियन म्हणाला की, “लाफ्ट चॅलेंजचे आमचे साेबती पराग कंसारा जी आता आमच्यासोबत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीच्या उलटा विचार करा म्हणत आम्हाला हसवत होते.” व्हिडीओमध्ये सुनीलने असेही म्हटले आहे की, “कॉमेडीच्या दुनियेला कुणाची नजर लागली आहे हे कळतच नाही. आधी राजू भाई गेले आणि आता आपण पराग जी यांना गमावले. एकामागून एक विनोदाचे आधारस्तंभ आपण गमावत आहोत.” यादरम्यान कॉमेडियने ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतील अभिनेता दीपेश भानलाही आठवले.

पराग कंसारा हे गुजरातचे हाेते रहिवासी 
पराग कंसार (Parag Kansara) गुजरात, वडोदरा येथील रहिवासी होते. बऱ्याच काळापासून ते छोट्या पडद्यापासून आणि शोजपासून दूर होते. ते टीव्हीच्या सुपरहिट कॉमेडी रिऍलिटी शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये स्पर्धक म्हणून दिसले होते. हा शो भारतीय टेलिव्हिजनचा पहिला शो होता ज्याने स्टँडअप कॉमेडियन्सना एक मोठा व्यासपीठ देण्याचे काम केले. या शोने नवीन विनोदी कलाकारांनाही आपला ठसा उमटवण्याची संधी दिली. या शोमधून पराग यांना घरोघरी ओळख मिळाली.

लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सीझनमध्ये होते स्पर्धक 
पराग कंसारा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सीझनचे स्पर्धक होते. या शाेचे ते विजेता होऊ शकले नाही. मात्र, त्यांची कॉमेडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या शोशिवाय ते कॉमेडी शो ‘कॉमेडी का किंग कौन’ मध्येही दिसले हाेते. मात्र, ते गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही कॉमेडी शोमध्ये दिसले नाही. 2011 मध्ये त्यांना वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी एक वर्षाची शिक्षा झाली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
असं काय घडलं की, ‘केबीसी 14’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांना अश्रू झाले अनावर

आलियाचा मोठा खुलासा! पती रणबीर नाही, तर ‘ही’ व्यक्ती ठेवते बँकेतील पैशांचा हिशोब

हे देखील वाचा