अनन्या पांडेचे ‘हे’ आकर्षक फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘लाल परी’

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या नवीन फोटोशूटचे अनेक फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून, तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.

अनन्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. अनन्याच्या या फोटोंवर तिच्या फॅन्ससोबतच तिचे मित्रही कमेंट्स करत आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खाननेही अनन्याच्या फोटोवर कमेंट केली आहे. अनन्याने तिचे हे ग्लॅमरस फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “the cherry on the cake” तसे पहिले तर तिने दिलेले हे कॅप्शन तिच्या फोटोंना तंतोतंत जुळताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

सुहानाने अनन्याच्या फोटोवर कमेंट करत ‘सत्य’ असे लिहिले आहे. यासोबतच तिने हार्ट आय इमोजीही शेअर केला आहे. अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरनेही अनेक हार्ट इमोजीसह ‘ब्युटी’ लिहिले आहे. त्याचवेळी, महीप कपूरने चेरी आणि फायर इमोजीसह फोटोवर कमेंट केली आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली जी अनन्याची चांगली मैत्रीण देखील आहे. तिने तिच्या फोटोवर फायर इमोजी बनवून कमेंट केली आहे.

अनन्याच्या ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यन देखील होते. दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अनन्याने एक फोटो शेअर केला असून, या फोटोमध्ये कार्तिक, भूमी आणि अनन्या दिसत आहे. अनन्याने हा फोटो पोस्ट करताना लिहिले आहे की, “कोणी डेझर्टबद्दल विचारले का? #2YearsOfPatiPatniAurWoh – या खास चित्रपटाशी निगडीत अनेक आठवणी आहेत. प्रेम आणि हास्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार.”

View this post on Instagram

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

गेल्या ६ महिन्यात अनन्या लॉस वेगास (LA) मध्ये तिच्या आगामी ‘लायगर’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. तिने त्याचा को-स्टार विजय देवरकोंडासोबत घोड्यावर स्वार झाल्याचे फोटो शेअर केले आहेत. तिने बॉक्सर माईक टायसनसोबतचा देखील एक फोटो शेअर केला होता. माइक टायसनही ‘लायगर’मध्ये दिसणार आहे.

यावर्षी जानेवारीमध्ये करण जोहरने चित्रपटाचे अधिकृत पोस्टर शेअर केले होते. करण जोहर या प्रोजेक्टची, सहनिर्मिती करत आहे. पुरी जगन्नाथ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात रम्या कृष्णन, रोनित रॉय, विशू रेड्डी हे देखील दिसणार आहेत.

अधिक वाचा –

Latest Post