Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड चंकी पांडेच्या लेकीला ‘सपाट छातीवाली’ म्हणत ट्रोल करायचे लोक, वेदना सांगताना हळहळली अभिनेत्री

चंकी पांडेच्या लेकीला ‘सपाट छातीवाली’ म्हणत ट्रोल करायचे लोक, वेदना सांगताना हळहळली अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये काम करणे कोणत्याही कलाकारासाठी सोपी गोष्ट नाहीये. यामध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना बॉडी शेमिंग आणि कास्टिंग काऊच यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. मात्र, यावर मात करत अभिनेत्री आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे ही होय. अभिनेते चंकी पांडे यांची लेक अनन्या नुकतीच वादग्रस्त पण तितकाच प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’मध्ये दिसली होती. इथे तिने ‘लायगर’ सिनेमातील सहकलाकार विजय देवरकोंडासोबत मजा-मस्ती केली. तसेच, स्वत:वर बेतलेल्या गोष्टींचाही खुलासा केला.

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिने ट्रोलिंगबाबत दु:ख व्यक्त केले. अनन्या ही ऑनलाईन ट्रोलर्सची आवडती आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, अनेकदा बॉडी शेमिंगसाठी तिच्यावर निशाणा साधला गेला आहे.

अनन्याने मांडली व्यथा
करण जोहर (Karan Johar) याच्यापुढे अनन्याने सांगितले की, ती जेव्हा १९ वर्षांची होती, तेव्हा सोशल मीडियावर लोक तिला वाईट दिसते आणि सपाट छाती असणारी म्हणायचे. अशा ट्रोलिंगचा मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता का, असे करणने अनन्याला विचारले. यावर उत्तर देत ती म्हणाली की, “नक्कीच, हे माझ्यावर परिणामकारक असते. मी इथे बसून नाटक करू शकत नाही की, मी आनंदी आहे किंवा मी खूप मजबूत आहे. तसेच, मी कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकते. कारण, मला वाटते की, १९ वर्षांच्या वयात, जेव्हा तुम्हाला म्हटले जाते की, तू वाईट दिसते आणि तू सपाट छाती असणारी आहेस, तेव्हा हे खूप भयानक असते. आता मी अशी आहे, तर काय करू शकते, यात माझी चूक काय आहे?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

ट्रोलर्समुळे अनन्याला वाटते चिंता
पुढे बोलताना ती म्हणाला की, “मी एक चांगली व्यक्तती बनण्याचा प्रयत्न करते. मी खूप मेहनत घेते. मी आपल्या कामाबाबत खूप प्रामाणिक आहे. मला अभिनय आवडतो. मला आठवते की, मला नेहमीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. मला माहिती नाही की, मी लोकांना दुखवण्यासाठी काय चुकीचं केले आहे. मात्र, मी हे समजू शकते की, हे लोक कुठून येत आहेत आणि हे ठीक आहे.”

कंगनानेही साधलाय निशाणा
खरं तर, ट्रोलर्सचा सामना करणाऱ्या अनन्यावर कंगना रणौत हिनेही नेपोटिझम आणि तिच्या अभिनयासाठी तिला ट्रोल केले आहे. अनन्याने सांगितले होते की, स्टारकिड असूनही तिला खूप मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. यावरही लोकांनी तिची थट्टा उडवली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘सर्व शक्ती पणाला लावावी लागेल’, बॉलिवूड सिनेमांबाबत असे का म्हणाला करण जोहर? जाणून घ्याच
हॉटनेसचा तडका! छोट्या पडद्यावरील अभिनेत्री पाण्यातच झाली बोल्ड, फोटोवर धडाधड पडला कमेंट्सचा पाऊस
रँपवॉक करतोय अर्जुन, पण लक्ष वेधलं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मलायकाने, कॅमेऱ्यात कैद झाला क्षण

हे देखील वाचा