‘सर्व शक्ती पणाला लावावी लागेल’, बॉलिवूड सिनेमांबाबत असे का म्हणाला करण जोहर? जाणून घ्याच

बॉलिवूड सिनेसृष्टीसाठी हे वर्षे काही खास राहिले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेले सिनेमे एकापाठोपाठ एक करत बॉक्स ऑफिसवर दणादण आपटले. अभिनेत्री कंगना रणौत हिचा ‘धाकड’ हा सिनेमा पहिल्या दिवशीच फ्लॉप ठरला होता. दुसरीकडे, साऊथच्या ‘पुष्पा’पासून ते ‘विक्रम’पर्यंत अनेक सिनेमांनी छप्परफाड कमाई केली. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेले ‘शमशेरा’ आणि ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हे सिनेमे खूपच फ्लॉप ठरले. यानंतर आता नेटकरी म्हणत आहेत की, हिंदी सिनेमांना चित्रपटगृहात प्रेक्षकांनी नाकारले आहे. बॉलिवूडला ट्रोल करणाऱ्यांना आता निर्माता करण जोहर याने चांगलेच सुनावले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, करण जोहर (Karan Johar) याने बॉलिवूड संपण्याच्या चर्चांना मूर्खपणा म्हटले आहे. त्याने म्हटले की, “चांगले सिनेमे नेहमीच काम करतात.” करणने उदाहरण म्हणून ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘भूल भुलैय्या २’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा उल्लेख केला. त्याने असेही म्हटले की, “माझ्या ‘जुग जुग जिओ’ या सिनेमानेही चांगली कामगिरी केली आहे.” तो पुढे म्हणाला की, “जे सिनेमे चांगले नाहीत, ते कधीही काम करू शकत नाहीत आणि त्यांनी कधीही काम केले नाही.”

यादरम्यान त्याने म्हटले की, “‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षा बंधन’, ‘ब्रह्मास्त्र’, रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ यांसारखे सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. या वर्षाचा शेवट सलमान खान याच्या एका मेगा बजेट सिनेमाने होणार आहे. येणाऱ्या काळात अनेक मोठे सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.” शेवटी करण असेही म्हणाला की, “बॉलिवूडला अजूनही प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.”

तो म्हणाला, “प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणणे आता इतके सोपे नाही. तुमचा चित्रपट, ट्रेलर, कँपेन, सर्व काही प्रेक्षक थिएटरमध्ये येतील इतके चांगले आहे, याची तुम्हाला खात्री करावी लागेल. सर्व शक्ती पणाला लावावी लागेल. हे एक आव्हान आहे आणि मला आव्हाने आवडतात.” हे वृत्त हिंदुस्तान टाईम्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

करण जोहर याच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. हा सिनेमा तुफान हिट झाला होता. त्यानंतर त्याने जवळपास १० सिनेमांचे दिग्दर्शन केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
हॉटनेसचा तडका! छोट्या पडद्यावरील अभिनेत्री पाण्यातच झाली बोल्ड, फोटोवर धडाधड पडला कमेंट्सचा पाऊस
रँपवॉक करतोय अर्जुन, पण लक्ष वेधलं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मलायकाने, कॅमेऱ्यात कैद झाला क्षण
टॉपलेस फोटोशूट ते दिग्दर्शकासोबतचा वाद, ‘या’ कारणांमुळे वादात सापडली होती ‘बर्थडे गर्ल’ कियारा

Latest Post