Monday, July 1, 2024

प्रख्यात अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टी शोकसागरात

हॉलिवूड अभिनेत्री आणि मूळ अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्त्या सचिन लिटिलफेदर(Sacheen Littlefeather) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. माध्यमाच्या रिपोर्ट्सनुसार सचिन लिटिलफेदर या काही दिवसांपासून स्तनाच्या कर्करोगाचा सामना करत होत्या. अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसनेही सचिनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सचिन लिटिलफेदर कोण होत्या?
सचिन लिटिलफेदर यांचा जन्म 1946 मध्ये कॅलिफोर्निया येथे झाला. त्यांचे वडिल हे अमेरिकेचे होते तर आई ही युरोपियन होती. त्यांच्या पालकांनी त्यांचं नाव मेरी लुईस क्रूझ ठेवलं. पण 1970 मध्ये त्यांनी आपले नाव बदलून सचिन लिटलफेदर असे ठेवले.लिटलफेदर कॉलेजनंतर सचिन स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्डचा भाग बनल्या आणि तिथे त्यांची भेट अभिनेता मार्लन ब्रँडोशी झाली, ज्यांना मूळ अमेरिकन लोकांशी संबंधित समस्यांमध्ये रस होता. सचिन लिटिलफेदर यांच्या जीवनावर आणि कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या कार्यावरील सचिन ब्रेकिंग द सायलेन्स हा माहितीपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. सचिन लिटिलफेदर यांनी 1974 मध्ये रिलीज झालेल्या ‘द ट्रायल ऑफ बिली जॅक’ आणि ‘शूट द सन डाउन’ या चित्रपटांमध्ये काम केले.

अभिनेत्री सचिन यांचं निधन
ऑस्करच्या 45व्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सचिन लिटलफेदर यांनी मार्लन ब्रँडो यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नाकारला होता. हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील चर्चेत असणारा प्रसंग होता. 1973 मध्ये मार्लन ब्रँडोच्या वतीने अकादमी अवॉर्ड्स स्विकारण्यासाठी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या स्टेजवर सचिन लिटिलफेदर या आल्या होत्या. स्टेजवरील त्यांच्या 60 सेकंदांच्या भावूक भाषणानं अनेकांचे लक्ष वेधले. या भाषणामध्ये सचिन लिटिलफेदर यांनी सांगितलं की, ‘आज चित्रपटसृष्टीने अमेरिकन भारतीयांना दिलेली वागणूक ही योग्य नाही’ अमेरिकन भारतीयांना चांगली वागणूक न दिल्यानं सचिन लिटिलफेदर यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर बहिष्कृत करण्यात आले. गेल्या 50 वर्षांपासून त्याच्याशी भेदभाव करण्यात आला.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की 1973 मध्ये एका वादानंतर जवळजवळ 50 वर्षांनी, अकादमीने लिटलफेदरची माफी मागितली आणि दोन आठवड्यांपूर्वी त्याच्या सन्मानार्थ समारंभ आयोजित केला. 50 वर्षांपूर्वी सचिन लिटिलफेदर यांनी ऑस्कर स्विकारण्यास नकार दिला होता. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, सचिनने अमेरिकन लोकांच्या समर्थनार्थ ‘गॉड फादर’ चित्रपटातील व्हिटो कॉर्लिऑनच्या भूमिकेसाठी ऑस्कर नाकारला होता. नंतर पन्नास वर्षांनी ऑस्करनं या प्रसंगाबद्दल माफी देखील मागितली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
साऊथच्या दिग्गजांसोबत झळकणार ‘आपला सिद्धू’, ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचा टिझर आला समोर

मिस इंडिया बनूनही मान्या सिंगला मिळेना काम, भाईजान करणार मदत?

हे देखील वाचा