Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड साऊथच्या दिग्गजांसोबत झळकणार ‘आपला सिद्धू’, ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचा टिझर आला समोर

साऊथच्या दिग्गजांसोबत झळकणार ‘आपला सिद्धू’, ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचा टिझर आला समोर

महात्मा गांधी यांची जयंती 2 ओक्टोंबर रोजी साजरी केली जाते. त्याच दरम्यान एका नविन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ज्याचे गांधी क्नेक्शन खूप मनोरंजक आहे. गांधी टॉक्स असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेलेकर आहेत.

गांधी टॉक्सची घोषणा दमदार टीझरसह करण्यात आली आहे. झी स्टुडिओज, क्युरियस डिजिटल आणि मूव्ही मिल एंटरटेनमेंट यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात विजय सेतुपती(Vijay Sethupathi) यांच्यासोबत मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव(siddharth jadhav), अरविंद स्वामी(Arvind Swami) , आदिती राव हैदरी(Aditi Rao Hydari) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिले आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून टीझर पोस्ट करून ही मोठी बातमी चाहत्यांना दिली आहे.

किशोर बेलेकर यांची दमदार स्टारकास्ट घेऊन येत असलेली ही कथा ही डार्क कॉमेडी आहे. याची माहिती चित्रपटाच्या टीझरमध्ये देण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव जरी गांधी टॉक्स असेल परंतु यात काहीही बोलले नाही कारण हा मूकपट आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात मोठे नायक असलेले महात्मा गांधी यांचे जीवन आणि तत्त्वे हे केवळ माणसासाठीच नव्हे तर समाज आणि देशाच्याही उन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या मंत्रासारखे आहेत. पण मोठी गंमत म्हणजे बदलत्या काळानुसार लोकांनी गांधींच्या शिकवणीकडे पाठ फिरवली, पण नोटांवर छापलेला गांधींनाच आपला मार्गदर्शक बनवले.

या टीझरमध्ये सर्वांच्या हातात पैसे दिसत आहे. कुणाच्या तोंडात तर कुणाच्या डोक्यावर पैसे चिकटवलेले दिसत आहेत. या चित्रपट पैशांवर आधारित दिसतो आहे. विशेष म्हणजे हा लघुपट असणार आहे, जो कोणत्याही संवादाशिवाय तयार करण्यात आला आहे. हा मूकपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून एक डार्क कॉमेडी प्रकारातील चित्रपट आहे. चित्रपटाचा टीझर नुकताचं रिलीज झाला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“कारण मी धार्मिक आहे”, कंगना रनौतने ‘राम मंदिर’ मॉडेलवर लावली बोली

सिद्धू मुसेवालानंतर प्रसिद्ध पंजाबी गायक अल्फाजवर हल्ला; हनी सिंगने शेअर केली पोस्ट, म्हणाला, ‘त्याच्यासाठी प्रार्थना…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा