बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन कोण? असा प्रश्न विचारल्यानंतर सर्वांच्या तोंडात कदाचित एकच नाव येईल, ते म्हणजे जॉनी लिव्हर होय. जॉनी लिव्हर याने आपल्या कॉमेडीने सर्वांनाच पोट धरून हसायला भाग पाडले आहे. माणूस कितीही टेन्शनमध्ये असला, तरी जॉनीची कॉमेडी बघून कदाचित तोदेखील हसून हसून लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाही. अशात जॉनीच्या पावलांवर पाऊल टाकत त्याची मुलगी जेमी लिव्हर ही देखील अभिनेत्री आणि कॉमेडियन बनली आहे. ती अनेक कलाकारांची मिमिक्रीही करते. अशातच तिने ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हिची मिमिक्री केली आहे.
राखी सावंत (Rakhi Sawant) हिची मिमिक्री करताना जेमी लिव्हर (Jamie Lever) हिच्यासोबत असे काही होते की, तिच्याही भुवया उंचावतात. जेमीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मागून आली खरीखुरी राखी सावंत
जेमी लिव्हर जशी आपल्या मिमिक्रीला सुरुवात करते, तेव्हा लोक याचा भरपूर आनंद घेतात. तसेच, त्यांनी जेमीची मिमिक्रीही आवडते. तेवढ्यात पाठीमागून खरीखुरी राखी सावंत येते. राखीला पाहून जेमीच्या भुवयाही उंचावतात. हे सर्वकाही फक्त एका चेष्टेचा भाग होता. या दोघींचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून त्यावर वेगवेगळ्या कमेंट्सही येत आहेत.
View this post on Instagram
आशा भोसले यांचीही केली होती नक्कल
कॉमेडीसोबतच जेमी लिव्हर ही तिच्या मिमिक्रीसाठीही ओळखली जाते. आतापर्यंत तिने अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मिमिक्री केली आहे. यामध्ये आशा भोसले यांच्याही नावाचा समावेश आहे. तिच्या आशा भोसलेंच्या मिमिक्री व्हिडिओलाही चाहत्यांची चांगली पसंती मिळाली होती.
जेमीची कारकीर्द
जेमीला इंडस्ट्रीत आता ९ वर्षे झाली आहेत. दुसरीकडे, तिच्या वडिलांना म्हणजेच जॉनी लिव्हर यांना इंडस्ट्रीत ४ दशके झालीत. असे असूनही तिने कधीच वडिलांच्या नावाचा फायदा घेतला नाही. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. तिने कपिल शर्मा शोव्यतिरिक्त इतर अनेक कॉमेडी शोमध्ये भाग घेतला आहे. याव्यतिरिक्त हाऊसफुल आणि किस किस को प्यार करूं या सिनेमातही तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.