Tuesday, July 9, 2024

नुसरतने केले यशसोबतच्या दुसऱ्या लग्नाचे गुपीत उघड; मुलाच्या संगोपनावरही अभिनेत्रीचे मोठे वक्तव्य

बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मग ते नुसरतचे बिझनेसमन निखिल जैनसोबतचे लग्न तुटणे असो, मूल होणे असो किंवा अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असणे. यश दासगुप्ता हा नुसरतच्या मुलाचा वडील आहे. त्यामुळे नुसरतने यशसोबत दुसरे लग्न केले आहे का? असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोंगावत आहे. आतापर्यंत नुसरत आणि यशच्या लग्नाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. पण त्यामागील सत्य काय आहे. नुसरतने माध्यमांशी बोलताना यशसोबतच्या लग्नाचा सस्पेन्स उघड केला आहे. त्याचबरोबर आपला मुलगा धर्मनिरपेक्ष असल्याचेही तिने बोलून दाखवले आहे.

मुलाखतीत नुसरत जहाँला यश दासगुप्तासोबतच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी “आम्हाला पुन्हा लग्न करण्याची गरज नाही,” असे अभिनेत्री म्हणाली. नुसरतला पुढे विचारण्यात आले होते की, “यश हिंदू आहे आणि तू मुस्लिम आहेस. मग तुमचे मूल कसे मोठे होईल?”

या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, “चांगल्या व्यक्तीप्रमाणे. आपण सर्वांनी एक चांगला माणूस म्हणून वाढले पाहिजे. मी मुस्लिम आहे आणि यश हिंदू आहे. माझ्या मुलाला दोन्ही धर्मातील चांगल्या गोष्टी कळतील. तो मानवतेची जशी पाहिजे तशी सेवा करेल. पालक या नात्याने आपण नेहमी खुल्या मनाचे असू.”

“आम्ही आमच्या घरी दिवाळी, दुर्गापूजा, ईद, ख्रिसमस सर्व काही साजरे करू. त्याचप्रकारे आम्ही सेक्युलर भारताचे आदर्श उदाहरण ईशानसमोर ठेवू. मला खात्री आहे की तो धर्मनिरपेक्ष भारताचा आदर्श नागरिक होईल.”

नुसरत जहाँने ऑगस्ट २०२१ मध्ये मुलाला जन्म दिला होता. मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात वडिलांचे नाव यश दासगुप्ता असे लिहिले होते. त्यानंतरच नुसरतच्या मुलाच्या वडिलांचे नाव समोर आले.

नुसरत जहाँच्या गरोदरपणात तिचे यश दासगुप्तासोबतचे नाते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. नुसरत आणि यशने त्यांच्या नात्याला अधिकृत केल्यानंतर ते अनेकदा एकत्र दिसतात. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते.

नुसरतचे पहिले लग्न वादात सापडले होते. २०१८ मध्ये, नुसरतने तुर्कीतील बोडरम येथे बिझनेसमन निखिल जैनसोबत लग्न केले होते. चाहते दोघांनाही आयडल कपल मानायचे, पण त्यांच्या नात्याचं सत्य काही औरच होतं.

लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात तणाव निर्माण होऊ लागला. नुसरतने निखिलसोबतचे लग्न स्वीकारण्यास नकार दिला. निखिलसोबतचे तिचे लग्न कायदेशीर नसल्याचे तिने सांगितले होते. त्यामुळे निखिलपासून घटस्फोट घेण्यात काही अर्थ नाही. निखिल आणि नुसरतने एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते.

हेही पाहा- बाई वाड्यावर या’ बोलणाऱ्या निळू भाऊंनी लहान असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता | Nilu Fule

निखिलपासून वेगळे झाल्यानंतर नुसरत मुलगा ईशान आणि यश दासगुप्तासोबत आपले सुखी वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. तसेच मातृत्वाचा आनंद लुटणारी नुसरत जहाँ कामावर परतली आहे. तिने शेवटच्या ‘स्वास्तिक संकेत’ या चित्रपटात काम केले होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा