Saturday, May 17, 2025
Home कॅलेंडर लग्न, अफेअर किंवा गर्भधारणाच नाही, तर खूपच मोठी आहे नुसरत जहाँशी संबंधित वादांची यादी

लग्न, अफेअर किंवा गर्भधारणाच नाही, तर खूपच मोठी आहे नुसरत जहाँशी संबंधित वादांची यादी

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुसरतची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोविंग आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुसरत कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे, तर कधी प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. नुकतीच नुसरत तिचा पती निखिल जैनपासून विभक्त झाल्यामुळे चर्चेत आली होती. नुसरत आणि निखिल जैन आता आपापल्या मार्गाने वेगळे झाले आहेत. याशिवाय ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. नुसरतचा वादांशी खोलवर संबंध आहे. नुसरत शनिवारी (०८ जानेवारी) तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याशी संबंधित वादांच्या यादीबद्दल…

नुसरत जहाँचा जन्म ८ जानेवारी, १९९० रोजी कोलकाता येथे झाला होता. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी नुसरत मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती. नुसरतने तिच्या करिअरची सुरुवात २०१० मध्ये मॉडेलिंगपासून केली होती. त्याचवर्षी ती फेअर वन मिस कोलकाता झाली होती.

नुसरतचे वादाशी जरा जास्तच जवळचे नाते आहे. याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा आला आहे. मागील वर्षी २०२० मध्ये दुर्गापूजेदरम्यान नुसरतने (Nusrat Jahan) ढाक वाजवले होते, त्यावरही मुस्लिम धर्मगुरूंनी आक्षेप घेतला होता. इथास उलेमा-ए-हिंदचे उपाध्यक्ष मुफ्ती असद कासम यांनी नुसरतला ‘हराम’ असे म्हटले होते. यापूर्वी, नुसरत तिच्या लग्नाची वैधता, विवाहबाह्य संबंध, गर्भधारणा आणि निखिल जैनपासून वेगळे होण्याचे आरोप यामुळे जोरदार चर्चेत होती.

नुसरतने ऑगस्ट २०२० मध्येच तिचा मुलगा ईशानला जन्म दिला आणि अलीकडेच यश दासगुप्तावरील तिचे प्रेम व्यक्त केले. यश दासगुप्ताच्या प्रेमात असल्याचे तिने उघडपणे कबूल केले आहे. नुसरतचे नाव २०१६ मध्ये अचानक चर्चेत आले होते, जेव्हा तिचा कथित बॉयफ्रेंड कादर खानला सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. नुसरतवरही आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप होता.

झाली होती अटक
नुसरत २०१६ मध्ये विधानसभा निवडणुकीत टीएमसीची स्टार प्रचारक होती. अभिनेत्रीच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या आयटी सेलच्या एका कार्यकर्त्याला तिच्यावर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

वेस्टर्न ड्रेस
खासदार झाल्यानंतर नुसरत वेस्टर्न ड्रेस परिधान करून संसदेत पोहोचली, त्यानंतर ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. तिथे तिने मिमी चक्रवर्तीसोबत सेल्फीही घेतला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

ट्रोलर्स आणि कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर
निखिल जैनसोबत लग्न करून नुसरत परत आली तेव्हा साडी, बांगडी, बिंदी, मेहंदी लावून नुसरत जहाँ संसदेत पोहोचली. त्यानंतर ती पुन्हा एकदा ट्रोलर्स आणि कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आली.

नुसरत जहाँ लग्नामुळेही होती चर्चेत
नुसरत तिच्या लग्नामुळेही चर्चेत होती. तिने २०१९ मध्ये परदेशात निखिल जैनशी लग्न केले. एका वर्षानंतर नुसरतने हे लग्न बेकायदेशीर ठरवले. नुसरतने निखिलसोबत केलेले लग्न भारतीय कायद्यानुसार वैध नसल्याचे वक्तव्य केले होते. निखिल जैनपासून वेगळे झाल्यानंतर यश आणि नुसरतच्या नात्याच्या बातम्या पसरू लागल्या. नुसरतने तिच्या मुलाच्या वडिलांची ओळख बराच काळ लपवून ठेवली होती, पण नंतर मीडियासमोर सांगितले की, तिच्या मुलाचे वडील यश आहे.

नुसरत २०१९ मध्ये प्रकाशझोतात आली, जेव्हा तिचे नाव तिचा बालपणीचा मित्र व्हिक्टर घोष याच्याशी जोडले गेले. माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दोघांनी खूप पूर्वी लग्न केले आहे आणि निखिलशी लग्न करण्यासाठी तिने व्हिक्टरपासून घटस्फोट घेतला होता. मात्र, नुसरतने कधीही त्यांचे नाते किंवा लग्न स्वीकारले नाही. या घटस्फोटासाठी नुसरतला मोठी भरपाई द्यावी लागल्याचेही म्हटले गेले आहे.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा