भारीच ना! अंजली राघवच्या नवीन गाण्याची धम्माल; केला ३१ लाख व्ह्यूजचा टप्पा पार

Actress Anjali Raghav Latest Haryanvi Song Went Viral In Social Media More Than 30 Lakh Views On The Video


मागील काही काळापासून संगीतक्षेत्रातील ट्रेंड फारच बदलला आहे. आता फक्त बॉलिवूडच नाही, तर हरियाणवी, भोजपुरी आणि पंजाबी गाण्यांनाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. पंजाबी, भोजपुरी आणि हरियाणवी या तिन्ही इंडस्ट्रीत गाणी प्रदर्शित करण्याची जणू शर्यतच लागली आहे. मागील सहा ते सात महिन्यांपासून हरियाणवी गाणे मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झाले आहेत. या गाण्यांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. आता पुन्हा एकदा एक हरियाणवी गाणे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या गाण्याचे नाव आहे ‘लांबो घुंघट.’

यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक दिवस हे गाणे ट्रेंडिंग लिस्टमध्ये होते. या गाण्यात हरियाणवी मॉडेल अंजली राघवसोबत प्रेक्षकांना अजय धनकरही दिसला आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे आणि त्यांच्या या गाण्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. गाण्यातील दोघांमधील भांडणाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.

विशेष म्हणजे, हे गाणे टिप्स हरियाणवी या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर २५ मे रोजी प्रदर्शित झाले होते. या गाण्याला आतापर्यंत ३१ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘लांबो घुंघट’ गाणे फरिस्ता आणि ए. के. जट्टी यांनी गायले आहे, तर या गाण्याचे बोल आमिन बडौदी यांनी लिहिले आहेत. याव्यतिरिक्त या गाण्याला संगी अरविंद जंगीद यांनी दिले आहे.

अंजली ही हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध मॉडेल आहे. जी म्युझिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. जेव्हा ती कोणतेही नवीन गाणे घेऊन येते, तेव्हा ते यूट्यूबवर धमाल करते. चाहतेही तिच्या गाण्यावर जीव ओवाळून टाकतात.

तिने आतापर्यंत ‘गजबन २’, ‘लेहंगा’, ‘घूंघट बेन’, ‘ठुमका’, ‘बहू काले की’, ‘सूट की कढाई’, ‘एक जोगन’, ‘सपना २’, ‘बलमा पावरफूल’ यांसारख्या अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.