‘ये जवानी है दीवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘डेंटल सर्जन’शी लगीनगाठ, फोटो केले शेअर

Yeh jawani hai deewani co star Evelyn Sharma got married


बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ रणबीर कपूरचा सन २०१३ साली प्रदर्शित झालेला ‘ये जवानी है दीवानी’ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी खूप चांगली भूमिका निभावली होती. या चित्रपटातील अभिनेत्री एवलिन शर्मा हिने ऑस्ट्रेलियाचे डेंटल सर्जन डॉक्टर तुषान भिंडी याच्याशी लग्न केले आहे. त्या दोघांनी मागच्या महिन्यात ब्रिस्बेनमध्ये 15 मे रोजी लग्न केले आहे. परंतु तिने एक महिन्यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

एवलिनने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने व्हाईट गाऊन घातला आहे, तर तुषानने सुट घातला आहे. एवलिनने फोटो शेअर करून लिहिले आहे की, “कायमचे (Forever).”

एवलिनने तिच्या लग्नाबाबत बोलताना सांगितले की, “तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राशी लग्न करत असाल, तर यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो? एकमेकांसोबत आमचं आयुष्य जगण्यासाठी आम्ही दोघेही खूप उत्साहित आहोत. आमच्या या स्पेशल दिवशी आम्हाला अनेकांची उपस्थिती हवी होती, पण ठीक आहे. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या सोबत आहेत ही गोष्ट आम्हाला माहीत आहे.”

आता लग्नानंतर ते सर्वांना ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. तुषानने सांगितले, “साखरपुडा झाल्यानंतर त्यांना लवकरात लवकर लग्न करायचे होते. परंतु कोरोनामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. परंतु आता आम्ही विचार केला की, आम्हाला लग्न केले पाहिजे. आम्ही खूप साध्या पद्धतीने लग्न केले आहे. आम्हाला जास्त गडबड नको होती. आम्हाला फक्त आमचे नाते अधिकृत करायचे होते.”

एवलिन आणि तुषान हे 2018 मध्ये एकमेकांना भेटले. त्यांनतर 2019 मध्ये तुषानने तिला लग्नासाठी विचारले. नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटाला 8 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी एवलिनने चित्रपटातील काही व्हिडिओ शेअर केले होते. हे व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले होते की, “माझ्या आवडत्या चित्रपटातील काही थ्रो बॅक सीन्स”

सध्या त्या दोघांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा चालू आहे. त्यांचे लग्नातील फोटो पाहून तिचे चाहते या फोटोवर कमेंट करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.