Wednesday, June 26, 2024

पार्टीमध्ये रोमँटिक झाले अंकिता लोखंडे अन् बॉयफ्रेंड विकी जैन; डान्स करताना एकमेकांना केली किस

‘पवित्र रिश्ता २’मधून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणारी अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अलीकडेच तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये ती तिचे मित्र आणि बॉयफ्रेंड विकी जैनसोबत मस्ती करताना दिसली. दोघांनीही एकत्र डान्स केला. त्याचवेळी अंकिता आणि विकी डान्स करताना इतके हरवून गेले की, दोघांमध्ये असे काही घडले की, ज्याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

डान्स करत केली किस
अंकिताने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लाल रंगाची साडी आणि त्यावर छान असा नेकलेस घातला आहे. तिचे मोकळे केस तिच्या खांद्यावर पडलेले खूप सुंदर दिसत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये ती विकी जैनसोबत डान्स करताना दिसत आहे. दोघेही डान्स करताना एकमेकांमध्ये हरवून जातात आणि किस करतात.

शेवटची दिसली ‘या’ शोमध्ये
अंकिता शेवटची ‘पवित्र रिश्ता रिबूट’मध्ये दिसली होती. तिने कंगना रणौत अभिनित ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने कंगनाची मैत्रीण झलकारीबाईची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती टायगर श्रॉफच्या ‘बागी ३’ मध्ये दिसली होती.

सुशांतसाठी उठवला आवाज
अंकिता तिचा दिवंगत बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळावा या मागणीबद्दल मोकळेपणाने बोलल्यामुळे ती चर्चेत आली होती. तिचा सध्याचा बॉयफ्रेंड विकी जैन नेहमीच तिच्या पाठीशी उभा होता. त्याने परिस्थिती कशी हाताळली याबद्दल त्याचे कौतुक करताना, अंकिताने त्याला जगातील सर्वोत्तम बॉयफ्रेंड म्हणून वर्णन करणारी एक नोट लिहिली होती.

केले होते खूप कौतुक
या चिठ्ठीत तिने लिहिले होते की, “माझे भूतकाळात मन तुटल्याने आणि निराशेमुळे मला आलेल्या वाईट अनुभवानंतर मला पुन्हा कधीही आनंद किंवा प्रेम मिळणार नाही, असे मला वाटत होते. मात्र, मग मी तुला भेटले आणि तू माझ्यावर विश्वास ठेवलास. आम्हाला प्रेम झाले आणि आम्ही पुन्हा ते लोक नव्हतो राहिलो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला जगातील सर्वात आनंदी मुलगी बनवल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या प्रेमाबद्दल धन्यवाद ज्यामुळे मला एक चांगली व्यक्ती बनण्याची प्रेरणा मिळते. विकीला सर्व समर्थनासाठी सलाम. मी तुला सर्व आनंद देण्याचे वचन देते. तुझा जोडीदार तुझ्यासाठी जे काही करत आहे त्याबद्दल त्याचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक माणूस ही परिस्थिती तुझ्याप्रमाणे हाताळू शकत नाही. सर्वकाळ आदर आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.”

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून टीव्हीवर तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये अंकिता अर्चनाच्या भूमिकेत दिसली होती. या व्यक्तिरेखेतील अंकिता प्रेक्षकांना खूप आवडली. या शोमध्ये तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत दिसला होता.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अंकिता ‘पवित्र रिश्ता २’मध्ये शाहीर शेखसोबत दिसली आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये अंकिताला खूप पसंती मिळाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा