Monday, June 17, 2024

‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लवकरच अडकणार लग्नबंधनात, शॉपिंगला केलीय सुरुवात?

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कलाकार लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नुकतेच विकी कौशल- कॅटरिना कैफ, रणबीर कपूर- आलिया भट्ट यांच्यानंतर आता अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. खरं तर, मागील काही दिवसांपासून अंकिता- विकी लग्न करणार अशा चर्चा सुरू होत्या. अंकिता आणि विकी दीर्घ काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अशातच आता असे म्हटले जात आहे की, हे जोडपे नोव्हेंबर महिन्यातच लग्न करणार आहेत. या जोडप्याने अद्याप यावर आपले मौन सोडलेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, या जोडप्याने लग्नाची तयारी सुरू केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीवर आता अभिनेत्री अंकिताने एक फोटो शेअर करत दुजोरा दिला आहे. अंकिताने अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचे नवीन सँडल दिसत आहेत. चाहत्यांचा असा विश्वास आहे की, अंकिताने अधिकृतरीत्या सांगितले आहे की, तिने लग्नाची शॉपिंग सुरू केली आहे. (Actress Ankita Lokhande Started Wedding Shopping Check First Pic)

Photo Courtesy: Instagram/lokhandeankita

सुशांतनंतर अंकिता विकीच्या प्रेमात
सुशांत सिंग राजपूतनंतर अंकिता लोखंडे विकी जैनच्या प्रेमात पडली होती. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. अंकिताने अनेकवेळा विकीवर प्रेम व्यक्त केले आहे. सोशल मीडिया आणि इंडस्ट्रीतील पार्ट्यांमध्ये अंकिता आणि विकीची जबरदस्त केमिस्ट्री स्पष्टपणे पाहायला मिळते.

नुकतेच घेतले नवीन घर

अनेक जोडपे लग्नानंतर जसे नवीन घरात शिफ्ट होतात, तसेच अंकिता आणि विकीही लग्नानंतर आपल्या नवीन घरात शिफ्ट होतील. या दोघांनीही मिळून एक घर घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घराचे फोटो समोर आले होते. अंकिता व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखली जाते. अंकिताने टीव्हीवर काम करण्याव्यतिरिक्त चित्रपटातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

अंकिता ‘मणिकर्णिक’ आणि ‘बागी ३’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली आहे.

हे देखील वाचा