टेलिव्हिजनवरील ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे ही घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील तिचे पात्र खूप गाजले होते. या मालिकेत तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मानवच्या मुख्य भूमिकेत होता. मालिकेमध्ये काम करता करताच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या प्रेमाच्या सर्वत्र रंगल्या होत्या. परंतु काही दिवसांनी त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले होते. पण सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर अंकिताने खूप दुःख व्यक्त केले होते. अंकिता ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना खुश करण्याची एकही संधी सोडत नाही.
अंकिता ही एक अभिनेत्री तर आहेच, पण ही गोष्ट खूप कमी जणांना माहित असेल की, ती एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. याचीच झलक तिने तिच्या या पोस्टवरून दिली आहे. अंकिताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. ती ‘केहना ही क्या’ या गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, अंकिताने गुलाबी रंगाचा टॉप आणि पांढरा प्लाझो परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “अब क्या कहे क्या नाम ले, कैसे उन्हे मैं पुकारू.”
तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांसोबत कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. अंकिताच्या या व्हिडिओवर अभिनेत्री अभिज्ञा भावे, अमृता खानविलकर, रश्मी देसाई आणि इशा अगरवाल यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (actress ankita lokhande’s dance video viral on social media)
अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांचे मानव आणि अर्चना नावाचे पात्र खूप गाजले होते. यानंतर अंकिताने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. तिने ‘मनिकर्णिका’या चित्रपटात काम केले. तसेच ती ‘बागी 3’मध्ये देखील दिसली होती. या चित्रपटात तिने श्रध्दा कपूर, टायगर श्रॉफ, रितेश देशमुखसोबत काम केले होते. ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेची शूटिंग करत आहे. ही मालिका प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…