अनुपम खेर यांची आई दुलारी सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सला खूप आवडतात. अनुपम खेर यांनी नुकताच त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांची आई दुलारी आपल्या मुलाला फटकारताना दिसत आहे. यासह त्यांच्याकडून १०,२० हजार लाख रुपयांची मागणीही केली आहे. नवरात्रीला, अनुपम खेर यांनी ‘जय माता दी’ या कॅप्शनसह त्यांच्या आईचा दुलारीचा एक भारी व्हिडिओ पोस्ट केला आहे.
दुलारीचा हा व्हिडिओ खरोखरच खूप सुंदर आहे. अनुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांची आई शर्ट उघडून दाखवत आहे. त्यांनी तो शर्ट अनुपम यांना गिफ्ट करण्यासाठी आणले आहेत. अनुपम त्यांनी आणलेल्या शर्टांची स्तुती केली. त्यावर त्यांच्या आई म्हणतात की, “तू खोटे बोलत आहेस,” तर अनुपम म्हणतात, “मी का खोटे बोलेन.” अनुपम विचारतात की, “सर्व शर्ट माझे आहे की, १ घ्यायचा आहे.” यावर त्यांची आई म्हणतात की, “जर तुला सर्व आवडले असतील, तर सर्व घे. तुझ्यापेक्षा जगात काय मोठं आहे.” अनुपम जेव्हा शर्टचे पैसे विचारतात तेव्हा त्या म्हणतात की, “मला आठवत नाही.” अनुपम पुन्हा विचारतात की, “पैसे दिले की नाही” हे ऐकल्यावर त्यांच्या आई चिडतात आणि म्हणतात, “तो तुझा बाप होता, जो असं सोडून देईल?” यानंतर त्या म्हणतात, “१०, २० हजार लाख दिले, आण दे दे.”
अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आईने काही शर्ट आणले. ही फक्त एक साधी व्यवहार प्रक्रिया असायला हवी होती पण आईसह हे शक्य नाही. त्यांना इकडचे-तिकडचे बोलण्याची गरज असते आणि कोणत्याही अर्थाशिवाय. बोलण्यात त्यांना माझ्या वडिलांना मध्ये घेण्याची पण सवय आहे. हे स्वतः पहा आणि आनंद घ्या, जय माता दी.”
आप सभी को नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएँ।माँ दुर्गा हम सबकी रक्षा करे और हमें स्वस्थ रखें।???????????? pic.twitter.com/Q33kHsyufp
— Anupam Kher (@AnupamPKher) October 7, 2021
यासह अनुपम खेर यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. ट्वीट करत लिहिले की, “तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. देवी दुर्गा आपल्या सर्वांचे रक्षण करो आणि निरोगी राहा.” त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून आजपासून सुरू झालेल्या नवरात्रीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांचे रक्षण आणि सर्वजण निरोगी राहण्याची देवीकडे प्रार्थना देखील केली आहे. अनुपम खेर यांनी केलेल्या या ट्वीटला त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बऱ्याच काळापासून गायब असणारा इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे तरी कुठे?
–फॅशन वीकमध्ये जलवे दाखवल्यावर पॅरिसच्या रस्त्यांवर अभिषेक, आराध्यासोबत फिरताना दिसली ऐश्वर्या राय
–रणबीरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी होणार सुरु, ‘या’ भूमिकेत दिसणार लव्हर बॉय