Friday, December 1, 2023

बऱ्याच काळापासून गायब असणारा इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे तरी कुठे?

लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता असणारा अभिजीत सावंत  शनिवारी(7ऑक्टोंबर) आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक काळ असा होता जेव्हा अभिजीतने गायलेली गाणी लोकांच्या ओठांवर रात्रंदिवस राहत होती. मात्र, आज अभिजीत लाईमलाइटपासून दूर आहे. तो चाहत्यांंच्या आठवणीत फार कमी आहे. ‘इंडियन आयडल’ शो 2005 मध्ये सुरू झाला होता आणि देशाला पहिला ‘इंडियन आयडल’ ठरला होता मराठमोळा अभिजीत सावंत. अभिजीतने 130 स्पर्धकांना जबरदस्त स्पर्धा दिल्यानंतर पहिल्या 11 मध्ये त्याने आपले स्थान मिळवले आणि त्यानंतर सर्वांना मागे टाकून इंडियन आयडलच्या ट्रॉफीवर नाव कोरले. केवळ गाण्यातच नाही, तर अभिजीतने ‘नज बलिए’मध्ये देखील आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. चला तर मग आजकाल अभिजीत काय करतो आणि कुठे असतो हे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया.

इंडियन आयडल जिंकल्यानंतर अभिजीतने ‘आपका अभिजीत’ नावाचा एक अल्बम देखील लाँच केला ज्याचे ‘मोहब्बतें लुटाउंगा’ गाणे आजही सुपरहिट गाण्यांच्या यादीत येते. या गाण्यानंतर अभिजीतचा दुसरा अल्बम ‘जुनून’ आला तो देखील सुपरहिट झाला. यानंतर त्याने इमरान हाश्मीच्या ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटात ‘मरजावां’ हे गाणे गायले जे सुपरहिट झाले. पण अभिजीत या गाण्यानंतर गायब झाला.

हिट गाणे देऊनही अभिजितला अपेक्षित यश मिळाले नाही. मग तो आणि त्याची पत्नी शिल्पा ‘नच बलिये’ या डान्स रियॅलिटी शोच्या चौथ्या पर्वात सहभागी झाले. या शोमधील त्याचा डान्स चाहत्यांना फारसा आवडला नाही आणि ते लवकरच शोमधून बाहेर पडले. यानंतर अभिजीतने ‘लॉटरी’ चित्रपटात काम केले. हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला.

अभिजीत सावंतला 2010 मध्ये लोकांनी रस्त्यावर मारहाण केली होती. त्याची मैत्रीण आणि गायिका असणाऱ्या प्राजक्ता शुक्रेने आपल्या कारने एका स्कूटरला धडक दिली. त्यानंतर लोकांनी कारमध्ये असलेल्या अभिजीत सावंतला मारहाण केली.

आज अभिजीत छोटे-छोटे स्टेज शो करताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये त्याने अनेक वेळा नशीब आजमावले पण लोकांना त्याचे गायन फारसे आवडले नाही. अभिजीतने हिंदीसोबतच मराठी गाणी देखील गायली आहेत. त्याचे मंगलाष्टक वन्स मोर सिनेमातील ‘सर सुखाची श्रावणी’ हे गाणे तुफान हिट झाले होते.

आधिक वाचा-
जेव्हा डिनरला ‘या’ अभिनेत्रींच्या घरी पोहचले होते राजकुमार, बोलले असे काही की, सर्वांनाच बसला धक्का
हेमा मालिनींच्या प्रेमात आकंठ बुडाले होते राजकुमार, प्रपोज केलं तर अभिनेत्रीने ‘या’ शब्दांत दिलं उत्तर

हे देखील वाचा