Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड ‘चकदा एक्स्प्रेस’साठी अनुष्का शर्मा करतेय प्रचंड मेहनत, कडक उन्हात घाम गाळताना दिसली अभिनेत्री

‘चकदा एक्स्प्रेस’साठी अनुष्का शर्मा करतेय प्रचंड मेहनत, कडक उन्हात घाम गाळताना दिसली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) अभिनय कौशल्याची सर्वांनाच कल्पना आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटातील प्रत्येक पात्राने तिने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आता अनुष्का शर्मा पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. ती ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. अनुष्काने काही काळापूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती आणि आता तिने त्याची तयारी सुरू केली आहे. आता अनुष्काने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मैदानात ट्रेनिंग करताना दिसत आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीवर आधारित आहे. अनुष्का क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे.

अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. वॉर्मअप झाल्यानंतर ती गोलंदाजी आणि फलंदाजी करत आहे. व्हिडिओमध्ये अनुष्काने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ट्राउजर परिधान केली आहे. त्यासह तिने कॅप देखील घातली आहे.

अनुष्काने व्हिडिओ केला शेअर
व्हिडिओ शेअर करताना अनुष्का शर्माने लिहिले की, “घाम गाळू या. दिवस मोजत असताना चकदा एक्स्प्रेसची तयारी अधिक कठीण आणि तीव्र होत आहे.” अनुष्काचा हा व्हिडिओ ५ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केला आहे. अभिनेता जहदीप अहलावतने अनुष्काच्या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

अनुष्काचे चाहते तिच्या या चित्रपटाची वाट पाहत नाहीत. एका चाहत्याने लिहिले की, “या चित्रपटाची प्रतीक्षा करू शकत नाही.” त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “गो गर्ल.”

अनुष्का शर्मा शेवटची शाहरुख खानसोबत ‘जीरो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात कॅटरिना कैफही मुख्य भूमिकेत होती. ‘जीरो’नंतर अनुष्काने कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही. ती चित्रपट आणि वेबसिरीजची निर्मिती करत आहे. तिने ‘पाताल लोक’ ही वेबसिरीज आणि ‘बुलबुल’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता सर्वांनाच अनुष्काच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. यावेळी ती काय करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे.

कोण आहे झुलन गोस्वामी
अनुष्का या चित्रपटात झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. झुलन गोस्वामी हे भारतीय क्रिकेट विश्वातील एक मोठे नाव आहे. ती भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे आणि भारताची सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखली जाते. आता झुलनने निवृत्ती घेतली आहे. पण तिने सर्व विक्रम मागे टाकले आहेत की, ते मोडणे जगभरातील खेळाडूंना कठीण जाईल.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा