Saturday, April 20, 2024

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये इथून पुढे कधीही दिसणार नाही नवजोत सिद्धू, हे आहे कारण

नवजोत सिंग सिद्धूला सगळीकडून मात मिळत आहे. त्याच्या करिअरची नाव बुडताना दिसत आहे. पंजाब विधान सभेचे निकाल लागल्यावर काँग्रेस नेता नवजोत अगदी खाली आला आहे. सिद्धूने त्याची पार्टी बदलली आहे. सगळं काही करून देखील त्याच्या हाती मुख्यमंत्र्याची खुर्ची आली नाही. निवडणूक हरल्यानंतर आता सगळीकडून त्याची चेष्टा केली जात आहे. असे देखील म्हटले जाते आहे की, त्याचे राजकीय करीअर आता संपले आहे. त्यामुळे तो आता ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये परत येणार आहे. त्याची शेरो-शायरी ऐकण्यासाठी सगळेजण उत्सुक देखील आहेत. तसेच अनेकजण त्याची चेष्टा देखील करत आहेत.

एकीकडे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि दुसरीकडे ‘द कपिल शर्मा’ शोचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे आता ना पंजाबची मुख्यमंत्र्याची खुर्ची त्याला मिळाली ना ‘द कपिल शर्मा शो’ची खुर्ची मिळाली. अशातच चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करून सांगितले आहे की, सिद्धूची ईच्छा असली तरी देखील तो आता ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परत येऊ शकणार नाही.

त्यांनी एक ट्विट करून लिहिले की, “ज्या लोकांना वाटते की, सिद्धूने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परत यावे त्यांना मी सांगू इच्छितो की, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने नवजोत सिंग सिद्धू विरुद्ध पाकिस्तानला सपोर्ट केल्यामुळे कोऑपरेशन इश्यू केला आहे. याचा अर्थ साफ आहे की, तो ‘द कपिल शर्मा’ करू शकत नाही.”

अशोक पंडित यांच्या हा ट्विटनंतर सिद्धूचे चाहते काही प्रमाणात नाराज झाले आहेत. १० मार्च हा दिवस सिद्धूच्या आयुष्यात एक काळी रात्र घेऊन आला आहे. त्यांनी पंजाबची निवडणूक हरली त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. सगळीकडून आता त्यांचे करीअर संकटात आले आहे. त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले आहे. केआरकेने देखील त्याच्यवर टीका करून त्याचे राजकीय करिअर इथेच संपले आहे असे सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा