आपल्या सर्वांची लाडकी शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने नुकताच तिचा ३२ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने सोशल मीडियावर तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले. अपूर्वाने तिचा वाढदिवस जवळच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत साजरा केला. उत्कृष्ठ अभिनय, बोल्ड लूक आणि मादक अदांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा. सध्या ती आपल्याला झी युवा वरील ‘तुझं माझं जमतंय’ मालिकेत पम्मी नावाची भूमिका साकारताना दिसत आहे. अपूर्वाला तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
२७ डिसेंबर १९८८ साली जन्मलेल्या अपूर्वाने झी मराठीच्या ‘आभास हा’ या मालिकेतून अभिनयाची कारकीर्द सुरु केली. त्यानंतर तिने तू माझा सांगाती, आराधना, तू जीवाला गुंतवावे, प्रेम हे आदी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. अपूर्वाने काही नाटकं आणि चित्रपटातही काम केले. एकीकडे ती मनोरंजन क्षेत्रात नाव कमावत असताना दुसरीकडे तिने ‘अपूर्व कलेक्शन’ नावाने तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला. २०१५ साली अपूर्वाने तिच्या हँडमेड दागिन्यांचा ब्रँड बाजारात आणला. मनोरंजन क्षेत्रात बिझी राहूनही तिने तिची आवड जोपासत उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले.
झी मराठीच्या रात्रीस खेळ चाले २ या मालिकेने अपूर्वाला अफाट प्रेम आणि लोकप्रियता दिली. तिची ही मालिका सुपरहिट ठरत, तिचे शेवंता पात्र सुपरहिट झाले. खलनायिका साकारुनही अपूर्वाने या मालिकेतून शेवंता साकारत लोकांना वेड लावले. शेवंताची अदा, तिची बोलण्याची पद्धत सारं काही प्रेक्षकांना घायाळ करणारं होतं. यामालिकेसाठी अपूर्वाने तिचे ८/९ किलो वजनही वाढवले होते. या मालिकेमुळे अपूर्वाला लोकप्रियते सोबत अनेक पुरस्कारही मिळवले. अपूर्वाला अभिनयसोबतच कार चालवायला आणि फिरायला खूप आवडते. तिला तिच्या कार सोबत संपूर्ण भारत फिरायची इच्छा आहे. काही अंशी तिनी ही इच्छा पूर्ण देखील केली आहे.