Wednesday, June 26, 2024

ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

सर्व धर्म समभाव असलेल्या आपल्या भारतामध्ये पुन्हा एकदा हिंदू मुसलमान वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कलाविश्वात आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारे अनेक मुसलमान समाजाचे कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा करत आहेत. अशात आधी शाहरुख खान आणि इतर कलाकारांसह अर्शी खानला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

‘बिग बॉस’च्या १४व्या पर्वात झळकलेली अर्शी आपल्या दमदार अभिनयाने खूप चर्चेत होती . तिच्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. अशात तिच्या नवनवीन पोस्ट पाहणे चाहत्यांना फार आवडते. तिच्या दिलखेचक फोटो आणि व्हिडिओची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशात तिच्या सध्याच्या पोस्टने नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले आहे. अभिनेत्री आपल्या एका मित्राच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेली होती. तिने यावेळी आसामी लूक करत बाप्पाचे दर्शन घेतले. नेहमी प्रमाणे तिने आपल्या चाहत्यांसाठी तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यावर अनेकांनी तिच्या समोर इस्लामचा पाठच वाचायला सुरुवात केली. अनेकांनी तिला वाईट कमेंट केल्या आहेत. एकाने तर, “मी तुला अनफॉलो करतो” असे लिहिले आहे. (Actress Arshi Khan got trolled Don social media for or worshiping Ganpati the actress got angry by sharing the video on social media)

आर्शीने खडसावले ट्रोलर्सना
अभिनेत्रीने ट्रोलर्सना उत्तर देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणाली आहे की, “मंडळी मी छान आसामी लूक करून माझ्या मित्रांच्या घरी आलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. तुम्हाला छान वाटेल म्हणून मी माझे काही फोटो पोस्ट केले. परंतु घरी येऊन बघते, तर तुम्ही एवढ्या घाणेरड्या कमेंट केलेल्या आहेत. हो मला आभिमान आहे मी मुसलमान आहे. परंतु मी एक भारतीय देखील आहे. त्यामुळे भारतामधील सर्व सण मी साजरे करणार. मला यामधून आनंद मिळतो म्हणून सगळे सण साजरे करते आणि यापुढेही करणार, ज्याला कुणाला त्रास असेल त्यांनी माझ्या पेज वरून निघून जा.” अशा कडक शब्दांमध्ये तिने सर्वांना उत्तर दिलेले आहे. तसेच शेवटी ती “गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा” असे देखील म्हणाली.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रेसलिंग व्हिडीओमध्ये झळकत आहे. तसेच तिने ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वामध्ये देखील तिने चाहत्यांची खूप पसंती मिळवली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

-पहिलीपासून लपून दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ‘दबंग खान’ने चक्क बदलले होते स्वतःचे दात; मजेदार आहे तो किस्सा

-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा

हे देखील वाचा