Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड बॉलिवूडने असं काय केलं, ज्यामुळे दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना आली चीड? म्हणाल्या…

बॉलिवूडने असं काय केलं, ज्यामुळे दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना आली चीड? म्हणाल्या…

बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री आशा पारेख त्यांच्या अभिनयासोबतच शास्त्रीय नृत्यासाठीही ओळखल्या जातात. त्या प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी  ‘आसम’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 1959 मध्ये आलेल्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळाली, ज्यामध्ये त्यांनी शम्मी कपूरसोबत काम केले होते. मात्र, आता एका मुलाखती दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

आशा पारेख(Asha Parekh) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, “बॉलीवूड आता आपली भारतीय संस्कृती दर्शवत नाही, विशेषत: नृत्याच्या बाबतीत. त्यांना असे वाटते की, आजकाल लोक आपली भारतीय मुळे विसरले आहेत. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांना त्यांनी अपवाद मानले. त्यांनी गाण्यांच्या रिमिक्सवरही नाराजी व्यक्त केली आहे.”

बोस्टनमधील एका कार्यक्रमादरम्यान आशा पारेख म्हणाल्या, “आम्ही आमची नृत्य परंपरा विसरलो आहोत आणि आम्ही वेस्टर्न डांसचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं तुम्ही माझ्याशी सहमत असाल कारण की, आजकाल आपण ज्या प्रकारचा डान्स पाहतोय ती आपली शैली नाही.”

आशा पारेख यांनी केले भारतीय नृत्याचे कौतुक 
आशा पारेख पुढे म्हणाल्या, “ही आपली संस्कृती नाही. आपल्याकडे इतकी समृद्ध नृत्य परंपरा आहे की, प्रत्येक राज्याची स्वतःची नृत्यशैली आहे. पण आपण काय करत आहोत? वेस्टर्न डान्सचे अनुकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कधी कधी, तर असं वाटतं की, आपण एरोबिक्स करतोय डान्स नाही. हे पाहून माझे मन दुखावते.”

आशा पारेख यांनी संजय लीला भन्साळी यांचे कौतुक करत त्यांना अपवाद म्हटले आहे. त्या म्हणाल्या, “ते याच्याशी बांधले गेले आहेत. त्यांच्या कामात तुम्हाला भारतीय संस्कृतीबद्दलचा आदर पाहायला मिळतो. त्यांच्या गाण्यांचे रिमिक्स ‘भयंकर’ आहेत.”

95 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम
आशा पारेख यांनी 50 वर्षांपेक्षा जास्त काळच्या कारकिर्दीत 95 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये ‘कारवां’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंझिल’, ‘बहारों के सपने’ आणि ‘प्यार का मौसम’ या दमदार चित्रपटांचा समावेश आहे. आशा पारेख यांना काही दिवसांपूर्वी ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ मिळाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
बाॅलिवडूमधील ‘हे’ कलाकार का वापत नाहीत साेशल मीडिया? ‘नवाब’ सैफने दिले धक्कादायक कारण
सबा आझादने ट्रोलरला दिले सडेतोड उत्तर; स्क्रीनशॉट शेअर करत म्हणली, ‘हिच्यासारखे अनेकजण…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा