Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड तर ‘या’ कारणामुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख राहिल्या अजूनही अविवाहित, स्वतःच केला खुलासा

तर ‘या’ कारणामुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख राहिल्या अजूनही अविवाहित, स्वतःच केला खुलासा

बॉलिवूडमध्ये आपण पाहिले तर कलाकारांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान गाजतात. कलाकार आणि त्यांची नाती हा मीडिया आणि नेटकऱ्यांमधला सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय आहे. कोणता कलाकार कोणाला डेट करत आहे, याची इत्यंभूत माहिती मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये मिळते. कलाकार नात्यात असला काय आणि नसला काय त्याला एक प्रश्न मीडिया आणि फॅन्सकडून सतत विचारला जातो आणि तो म्हणजे, ‘लग्न कधी करणार?.’ कलाकारांच्या लग्नाचे मीडियाला आणि नेटकऱ्यांना भारी अप्रूप असते. मात्र या क्षेत्रात असेही अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडवर राज्य केले, करत आहे, पण अजूनही अविवाहित आहे.

कलाकार अविवाहित असण्यामागे त्यांचे असे कोणते ना कोणते वैयक्तिक कारण असते, कधी ते कारण मीडियासमोर येते तर कधी नाही येत. बॉलिवूडमध्ये ६०/७० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वानाच भुरळ घालणाऱ्या दिग्गज आणि जेष्ठ अभिनेत्री असलेल्या आशा पारेख यांनी देखील विवाह केला नाही. अतिशय सुंदर आणि प्रतिभावान असूनही आशा पारेख अविवाहित का राहिल्या याचे उत्तर आम्ही या लेखातून देणार आहोत.

मागील बऱ्याच काळापासून आशा पारेख चित्रपटांपासून लांब आहे. असे असूनही त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. त्या त्यांच्या चित्रपटांमुळे जितक्या जास्त प्रकाशझोतात आल्या तेवढ्याच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिल्या. वयाच्या ७९ व्या वर्षी देखील त्या अविवाहित आहे, यामागे नक्की काय कारण आहे याचे उत्तर त्यांनीच एका मुलाखतीमध्ये दिले होते.

आशा पारेख यांनी नुकतेच एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. यासोबतच त्यांनी या मासिकामध्ये मुलाखत देखील दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी लग्न न करण्याचे आणि मुलं नसल्याचे कारण सांगितले आहे. आशा पारेख यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मला मी लग्न न केल्याचे आणि मला मुलं नसल्याचे अजिबात दुःख नाही. मला वाटते की, माझे लग्न होणे ठरलेले नव्हते. खरं सांगायचे तर मला लग्न करणे आणि मुलं होणे नक्कीच आवडले असते. मात्र असे होणे कदाचित माझ्या नशिबात नव्हते. मला याचे अजिबात वाईट वाटत नाही.” या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरबद्दल देखील बऱ्याच गप्पा मारल्या.

आशा पारेख यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९५२ साली बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर त्यांनी घराना, जिद्दी, उपकार, आया सावन झूमके, कटी पतंग, मेरा गांव मेरा देश, कालिया, घर की इज्जत, कन्यादान आदी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. आशा पारेख यांनी ६० आणि ७० दशकात इंडस्ट्रीवर राज्य केले. मधल्या काही काळात त्या वहिदा रहमान आणि हेलन यांच्यासोबतच्या सहलीमुळे चांगल्याच प्रकाशझोतात आल्या होत्या. या तिघी अंदमानमध्ये त्यांच्या सुट्ट्या घालवण्यासाठी गेल्या होत्या. या तिघी अनेकदा एकमेकींसोबत वेळ घालवताना दिसतात.

हेही वाचा –
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? 12 वर्षांच्या वयातच धरलेली अभिनयाची कास; तिचीच रंगलीय चर्चा

जगाला अहिंसेचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आयुष्यावर आधारित सिनेमे, एका क्लिकवर पाहा यादी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा