Thursday, April 10, 2025
Home बॉलीवूड भयंकर! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न; ‘या’ व्यक्तीने वाचवला जीव

भयंकर! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न; ‘या’ व्यक्तीने वाचवला जीव

अभिनेत्री अश्विनी महांगडेने मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिच्या भूमिकेची प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली. अश्विनी महांगडेने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘मेरे साई’ या मालिकांमध्येही काम केले आहे. तसेच ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातही तिने भूमिका साकारली आहे.

अश्विनी महांगडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण अभिनेता नाना पाटेकर यांनी तिला वाचवले. अश्विनी महांगडेला नाना पाटेकर यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामुळेच तिने आत्महत्या करण्यापासून थांपली. अभिनेत्री अश्विनी महांगडेने आपल्या करिअरच्या सुरुवातीला बरेच संघर्ष केले. पण तिने कधीही हार मानली नाही.

अभिनेत्री अश्विनी महांगडेने ‘अजब गजब पोस्टकास्ट’ला नुकतीच मुलाखत दिली आहे. ती म्हणाली की, “ आयुष्य जगत असताना अनेकदा आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. त्यावेळी आता सगळं संपलंय अस वाटू लागते. कित्येक वर्ष मी प्रयत्न करायचे आणि आयुष्यात सगळ्याला किती सामोर जायचं. मला जगायचंच नाहीये. मी गेले होते आत्महत्या करायला की, आता नाही जमणार.”

अश्विनी पुढे बोलताना म्हणलाली की, “मीरारोडला शिवार गार्डन एरिआ आहे. तिकडे खूप मोठा तलाव आहे. मी तिथपर्यंत जाऊन बसले होते. नाना आले, माझ्या शेजारी बसले. मी खूप रडत होते. ते शांतपणे शेजारी बसले होते. मला शांत होऊ दिलं. मग त्यांनी डोक्यावर हात ठेवला. मला अजूनही रडू येतंय. त्यांनी एकच गोष्ट सांगितली, बघ परम्यातम्याने तुला काहीतरी सर्वोत्कृष्ट करायला इथे पाठवलं आहे. ते सर्वोत्कृष्ट अजूनपर्यंत तू केलेलं नाहियेस. मग तुझी सुटका कशी होणार इथून, ते सर्वोत्कृष्ट करण्यासाठी थांब आणि मी थांबले.” (Actress Ashwini Mahangde of Ai Khe Kya Karte fame tried to commit suicide)

आधिक वाचा-
झी मराठीवरील मालिकांना उतरती कळा, ‘ही’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
‘या’ कारणामुळे अनुष्का शर्माने रणवीर सिंगला डेट केले नाही; म्हणाली, ‘मला तो आवडतो पण…’

हे देखील वाचा