Tuesday, May 21, 2024

‘या’ कारणामुळे अनुष्का शर्माने रणवीर सिंगला डेट केले नाही; म्हणाली, ‘मला तो आवडतो पण…’

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात एकेकाळी डेटिंगच्या चर्चा होत्या. अनुष्का शर्मा आणि अभिनेता रणवीर सिंगने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. अनुष्काने या चर्चा फेटाळल्या होत्या. आता, रणवीर आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नानंतर अनुष्काचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती रणवीरबद्दल बोलताना दिसते.

या व्हिडिओमध्ये, अनुष्काला (Anushka Sharma) सिमी गरेवाल विचारतात की ती रणवीरला का डेट करत नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना अनुष्का म्हणते, “जर तुम्ही रणवीर आणि मला खरंच चांगले ओळखत असाल किंवा जे लोक आम्हाला चांगले ओळखतात, तर त्यांना माहीत आहे की आम्ही खूप वेगळे लोक आहोत.”

अनुष्का पुढे म्हणते, “आमचं नातं फार वेगळं आहे. आम्ही एकमेकांना मारू पण शकतो. मी त्याचे डोके फोडू शकते आणि हे मी खर सांगत आह. तो पण माझं डोकं फोडू शकतो. जर आम्हाला कधी रिलेशनशिपमध्ये यावं लागलं तर आम्हाला नात्यापासून वेगवेगळ्या गोष्टी अपेक्षित असतील. आम्ही दोघे आयुष्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने बघतो. तो अतिशय प्रॅक्टिकल आहे, मी अजिबात प्रॅक्टिकल नाही.”

अनुष्का म्हणते, “मला तो आवडतो, तो आकर्षक आहे. पण, माझ्यासाठी नातं फालतू असू शकत नाही. त्यामुळे जर मी एखाद्या पुरुषाबरोबर असेल तर त्याने मला शांत करणे आवश्यक आहे. नाहीतर त्या नात्याला काही अर्थ नसेल.” अनुष्का आणि रणवीर यांनी एकत्र “बँड बाजा बारात”, “लेडिस वर्सेस रिकी बहल” आणि “दिल धडकने दो” यांसारखे चित्रपट केले आहेत. रणवीरने 2018 मध्ये दीपिका पदुकोणशी लग्न केले, तर अनुष्काने 2017 मध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीला लग्न केले. (Anushka Sharma did not date Ranveer Singh due to this reason)

आधिक वाचा-
केवळ चार वर्षातच तुटले अदिती राव हैदरीचे लग्न, जाणून घ्या तिचे लग्न ते घटस्फोटाची कहाणी
झी मराठीवरील मालिकांना उतरती कळा, ‘ही’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

हे देखील वाचा