Monday, June 17, 2024

भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

दाक्षिणात्य आणि बॉलीवूड अभिनेत्री असिनने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आपल्या अभिनयाने सर्व चाहत्यांवर जादू निर्माण करत असिनने लोकांना वेड लावले. मूळची साऊथची असणाऱ्या असिनने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये देखील तिचे स्थान निर्माण केले. अभिनयात सक्रिय असणाऱ्या असिनने २०१६ साली लग्न केले आणि ती अभिनयापासून लांब गेली. सध्या आपले मदरहूड एन्जॉय करणाऱ्या असिनने नुकताच तिच्या मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. १५ ऑगस्टचे औचित्य साधत असिनने तिची मुलगी असणाऱ्या अरिनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या अरिनचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

असिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये अरिन घराच्या बागेत तिच्या गुलाबी लहान सायकलवर बसलेली दिसत असून, तिच्या सायकलला तिरंगा लावला आहे. मात्र या फोटोमध्ये अरिन मागे बघत असल्याने तिचा चेहरा दिसत नाही. असिनने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा फोटो शेअर केला आहे. मागील अनेक काळापासून असिन सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ३० ऑक्टोबर २०२० रोजी शेवटची पोस्ट केली होती. असिनने शेअर केलेल्या या फोटोसोबत असिनच्या फॅन पेजवर देखील अरिनचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या दोन्हीही व्हिडिओंमध्ये अरिनचा चेहरा दिसत नाही. (Actress Asin posted a photo of her daughter on the occasion of Independence Day)

 

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री असणाऱ्या असिनने आमिर खानच्या ‘गजनी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले. यानंतर ती सलमान, अक्षय, अजय आदी अनेक कलाकारांसोबत चित्रपटांमध्ये दिसली. मात्र अचानक २०१६ साली तिने उद्योगपती असणाऱ्या राहुल शर्माशी लग्न केले आणि ती चित्रपटांपासून लांब संसारात रमली. २०१५ साली तिचा ‘ऑल इज वेल’ हा अभिषेक बच्चनसोबतच शेवटचा सिनेमा रिलीज झाला होता.

सध्या असून तिच्या मुलींच्या संगोपनात व्यस्त असून, अजून तरी ती चित्रपटांमध्ये परतण्याचा तिचा कोणताही विचार नाही. आजही लोकनाच्या मनात तिने ‘गजनी’ चित्रपटामध्ये रंगवलेली बेधडक, भावनिक, चुलबुली, मस्तीखोर अशी कल्पना लक्षात आहे. तिचे फॅन्स तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

 

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तृतीयपंथीयांवर केलेला विनोद कॉमेडियन, अभिनेता असलेल्या वीर दासच्या आला अंगाशी, सोशल मीडियावर मागावी लागली माफी

अरे बापरे! भारती सिंगने भर शोमध्ये ‘या’ स्पर्धकाच्या वडिलांना केले ‘किस’, आईची या प्रकरणावर ‘ही’ होती रिऍक्शन

बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा

हे देखील वाचा