Tuesday, September 26, 2023

बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा

बॉलिवूडमधील दिग्गज निर्माता, दिग्दर्शक डेव्हिड धवन 16 ऑगस्टला वाढदिवस साजरा करत आहेत. डेविड धवन यांचा जन्म 16 ऑगस्ट 1955 रोजी जालंधर येथे झाला. डेव्हिड धवन हे त्यांचा 68व्या वाढदिवस साजरा करणार आहे. डेव्हिड धवन यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण कानपूर येथील क्रिस्ट चर्च कॉलेजमधून पूर्ण केले. पुढे चित्रपटांमध्ये येण्याच्या दृष्टीने त्यांनी चित्रपटांच्या शास्त्रशुद्ध शिक्षणासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया येथे प्रवेश घेतला. चित्रपसृष्टीत यशाचा शिखर गाठत असताना त्यांनी करुणा धवन यांच्याशी विवाह केला. त्यांना रोहित धवन आणि वरुण धवन ही दोन मुले असून, दोघेही चित्रपटसृष्टीतच कार्यरत आहे. वरुण हा आजच्या घडीचा आघाडीचा अभिनेता असून, रोहित दिग्दर्शक आहे. डेव्हिड यांची चित्रपटांमध्ये खरी जोडी जमली ते गोविंदासोबत. या जोडीने अनेक हिट सिनेमे दिले. बॉक्स ऑफिसवर या जोडीचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हटल्यावर तो हिट होणार हे नक्की. आज डेव्हिड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आणि गोविंदा यांच्या चित्रपटांबद्दल.

डेव्हिड धवन यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीच्या कारकीर्दीत मोठे यशाचे शिखर गाठले. त्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एक उत्तम निर्माता आणि उत्तम दिग्दर्शक म्हणून त्यांना बॉलिवूड मध्ये ओळखले जाते. अभिनेता गोविंदा बरोबर त्यांच्या सर्वच चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कुली नंबर 1 , हीरो नंबर 1 , बनारसी बाबू, दीवाना मस्ताना, बड़े मियां छोटे मियां, एक और एक ग्यारह, पार्टनर आदी जवळपास 17 चित्रपटांमधून डेव्हिड धवन आणि गोविंदा ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकली आणि मोठा धमाका केला. या लेखातून पाहूया गोविंदा बरोबर त्यांनी केलेले हिट सिनेमे. (happy birthday david dhawan)

कुली नंबर 1 :
आजही प्रेक्षकांच्या पसंतीचा असणारा हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. कुली नंबर 1 या चित्रपटात करिश्मा कपूर, कादर खान आणि गोविंदा यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता.

राजा बाबू: ‘
राजा बाबू हा चित्रपट साल 1994ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात देखील करिश्मा कपूर,  कादर खान आणि गोविंदा हे त्रिकुट दमदार अभिनय करताना दिसले.

जोडी नंबर 1:
जोडी नंबर 1 हा चित्रपट 13 एप्रिल 2001 रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला हिमेश रेशमियाने संगीत दिले होते. जोडी नंबर 1 या चित्रपटात संजय दत्त, गोविंदा, मोनिका बेदी आणि ट्विंकल खन्ना यांनी अभिनय केला होता.

कुली नंबर 1:
साल 2020 मध्ये डेव्हिड धवन यांनी ‘कुली नंबर 1’ या चित्रपटाचा रिमेक बनवला होता. या सिनेमात सारा अली खान व जॅकी भगनानी यांच्यासह वरुण धवन याने देखील या चित्रपटात अभिनय केला होता.

पार्टनर :
या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान आणि डेव्हिड धवन ही मस्त जोडी प्रेक्षकांना दिसली. या दोघांसह या सिनेमात कॅटरिना कैफ आणि लारा दत्ता मुख्य भूमिकेत दिसल्या.

अधिक वाचा- 
बारा वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न करणारा सैफ आहे 800कोटींहून अधिक संपत्तीचा मालक, ताफ्यात आलिशान गाड्या
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरांवर पार पडली शस्त्रक्रिया; ‘या’ आजाराने आहेत ते ग्रस्त

हे देखील वाचा