Saturday, June 29, 2024

विराटच्या नादात केएल राहुल विसरला प्रेयसीचा वाढदिवस; म्हणाला,’आपण सर्वकाही चांगले…’

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल  याच्यासाठी काल म्हणजेच 5 नोव्हेंबर हा उत्सवाचा दिवस होता. एकीकडे त्याचा मित्र आणि सहकारी क्रिकेटपटू विराट कोहली याचा वाढदिवस होता. तर दुसरीकडे, त्याची प्रेमिका अथिया शेट्टी  हिचाही वाढदिवस होता. सकाळपासून चाहते अथियाची पोस्टची वाट पाहत होते. दुसरीकडे अथियाने केकसोबतचे तिचे काही फोटो शेअर केले तेव्हा राहुलनेही आपले प्रेम व्यक्त केले.

अथिया शेट्टी (athiya shetty) हिने लेट नाईट केकसोबतचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती हातात केक धरताना दिसत आहे. केकवर ‘स्कॉर्पिओ बेबी’ असे लिहिले आहे. अथियाने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला 82 वर्षांची वाटत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.” या फोटोंमध्ये अथिया चेक नाईट सूटमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

केएलने पाेस्टद्वारे अथियावर व्यक्त केले प्रेम
केएल राहुलन (kl rahul) यानेही अथियाच्या या पोस्टवर आपले प्रेम व्यक्त केले. अथियाने फोटो शेअर करताच काही वेळातच राहुलने हार्ट इमोजी शेअर केला. त्याचवेळी त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर अथियासोबतचे 3 फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुम्ही सर्व काही चांगले करता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul???? (@klrahul)

केएल राहुलने बऱ्याच दिवसांनी अथियासंबधी काही पाेस्ट केले. अशा परिस्थितीत लाेकांचे म्हणणे हाेते की, विराट कोहलीच्या चक्करमध्ये ताे अथियाचा वाढदिवस विसरला.

अथियाच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर अथियाने आठ वर्षांत केवळ पाच चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2015 मध्ये रिलीज झालेल्या ‘हीरो’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती, ज्यामध्ये तो अभिनेत्री सूरज पांचोलीसोबत दिसली हाेती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर ही अभिनेत्री अनिल कपूर आणि अर्जुन कपूरच्या ‘मुबारकां’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर खास कमाई करू शकला नाही. यानंतर अथिया ‘नवाबजादे’, आणि ‘तडप’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली, परंतु हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! हे काय झालं वाढदिवसाच सरप्राईज द्याला गेली अन् कंबर ताेडून बसली

भारती सिंगच नव्हे तर, ‘या’ कलाकारांनीही झिजवली कोर्टाची पायरी, यादी पाहाच

हे देखील वाचा