Wednesday, July 3, 2024

‘मी कोणत्याच गोष्टीसाठी लायक नाही…’, घराघरात पोहोचलेल्या ‘आनंदी’ने वाईट काळाबद्दल केले वक्तव्य

बालिका वधू‘ या छोट्या पडद्यावरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘आनंदी’ म्हणजेच अभिनेत्री अविका गौर होय. अविकाने टीव्ही इंडस्ट्री गाजवल्यानंतर आता ती सिनेमात आपली कारकीर्द घडवत आहे. ती साऊथच्या अनेक सिनेमातही झळकली आहे. मात्र, इथपर्यंत पोहोचताना तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. ती सांगते की, तिने व्यावसायिकच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही चढ-उतार पाहिलेत.

अविका गौरच्या मनात यायचे ‘असे’ विचार
अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) हिने स्वत:च मान्य केले की, एक काळ असा होता, जेव्हा ती खूपच निराश होती. काम मिळत नसल्याने नाही, तर तिने केलेली मेहनत आणि प्रयत्न दिसत नव्हते. ती म्हणाली की, “मी जास्त वेळ विचारच करत होते की, ज्याप्रकारची कामं मला मिळत आहेत, त्यासाठी मी लायक नाहीये.” मात्र, नंतर असा काळ आला, जेव्हा तिने तिच्या समस्यांपासून सुटका मिळवण्याचा निर्णय घेतला.

तासंतास बसून रडायची अभिनेत्री
“मी यावर खूप काम केले आणि जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा वाटते की, जेव्हा मी यावर नियंत्रण मिळवू शकते, तर मी आयुष्यात काहीही करू शकते,” असे पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली. तिने आयुष्यातील गोष्टी सांगताना म्हटले की, “जेव्हा मी आयुष्यातील वाईट काळातून जात होते, तेव्हा मी स्वत:ला रडण्यासाठी आणि रुसण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देत होते. जेव्हा वेळ संपायचा, तेव्हा मी स्वत:लाच मनवायचे की, आता याबद्दल विचार करायचा नाही. हळूहळू मी समस्यांबद्दल विचार करणे बंद केले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

नकारात्मक होण्यासाठी आता वेळ नाही
अविका पुढे म्हणाली की, “मी खूप खुश आहे की, मी आपल्या वाईट काळातून मजबूत व्यक्ती बनून बाहेर पडले आहे.” ती म्हणते की, आता तिच्याकडे नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करण्यासाठी वेळ नाहीये. जेवढे तुम्ही याबद्दल विचार करता, तेवढेच तुम्ही तुमच्यात नकारात्मकता येते. त्यामुळे सकारात्मकतेवर लक्ष देणे गरजेचे आहे.

अभिनेत्री अविका गौर हिचा ‘कहाणी रबरबँड की’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमात तिच्यासोबत प्रतीक गांधी आणि मनीष रायसिंघन यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
फीफा विश्वचषकात परफॉर्म केल्यानंतर नोराने गाठले ईडीचे ऑफिस, काय आहे कारण?
आहा कडकच ना! रशियन महिलांवरही चढला ‘पुष्पा’चा फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा