×

‘मी पळून गेले नव्हते’, लग्नाच्या आठवणी सांगताना अभिनेत्री भाग्यश्री झाली भावुक

छोट्या पडद्यावर सध्या रोज नवनवीन मालिका आणि रियॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या रियॅलिटी कार्यक्रमांचे प्रेक्षकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. आता नुकताच स्टार प्लसवर स्मार्ट जोडी नावाचा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध कपल सहभागी झाले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीने (Bhagyashree) या कार्यक्रमात बोलताना तिच्या लग्नामध्ये आलेल्या अडचणींचा पाढा वाचला आहे. यावेळी ती खूपच भावूक झाल्याचे दिसत आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

स्टार प्लसवरील ‘स्मार्ट जोडी’ कार्यक्रम सध्या सगळीकडे चर्चेत आहे. या कार्यक्रमात नृत्य, क्रिडा, संगीत, दिग्दर्शन, अभिनय या प्रमुख क्षेत्रातल्या गाजलेल्या जोडप्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये नुकतीच लग्न केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेसह ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीनेही सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमात भाग्यश्री आणि तिचा पती हिमालय दासानीच्या लग्नाचे काही सुंदर क्षण पून्हा दाखवण्यात आले होते. यावेळी त्या दिवसांच्या कटू आठवणी पाहताना भाग्यश्रीला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. यावेळी ती खूपच भावूक झाली होती.

 

यावेळी आपल्या लग्नाच्या आठवणी सांगताना भाग्यश्री म्हणाली की, “माझ्या लग्नात माझ्या घरातून कोणीही आले नव्हते. मी आमच्या लग्नाबद्दल जेव्हा घरी सांगितले तेव्हा मला नकार देण्यात आला. याबद्दल ती पुढे म्हणाली की, आई वडील आपल्या मुलांसाठी सर्वस्व असतात. मात्र कधी कधी त्या मुलांच्या स्वप्नांचाही विचार करायला पाहिजे. कारण शेवटी त्यांचे ही आयुष्य असते त्यांची ही स्वप्ने असतात. जी त्यांना जगायची असतात, मिळवायची असतात.” हे बोलताना ती खूपच भावूक झाली आणि रडायला लागली. ज्यामुळे बाकी स्पर्धकही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. भाग्यश्री पुढे म्हणाली की “जेव्हा लोक मला सोशल मीडियावर मी पळून लग्न केल्याचे सांगतात तेव्हा खूप राग येतो. कारण मी पळून लग्न केले नाही. मी आणि हिमालयने गळ्यात हार घालुन लग्न केले आहे.” दरम्यान अभिनेत्री भाग्यश्री ही ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने त्याकाळात सर्वांनाच घायाळ केले होते.

Latest Post