Friday, March 29, 2024

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या’ कलाकारांनी हुबेहूब शंकराची भूमिका साकारत, मिळवली नवीन ओळख

देशभरात आज ( १ मार्च २०२०)  महाशिवरात्री उत्सव साजरा केला जात आहे. हिंदू पंचागानुसार, महाशिवरात्री म्हणजेच भगवान शिवाची उपासना, तपश्चर्या आणि श्रद्धेचा हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवासही करतात. भगवान शिव यांच्या कथेवर टीव्हीवरही अनेक कार्यक्रम बनवले गेले आहेत. महाशिवरात्रीच्या आजच्या दिवशी आपण पाहूया अशाच शिव शंकराच्या भूमिकेत गाजलेले प्रमुख कलाकार.

समर जयसिंग (Samar Jaisingh)

९० च्या दशकात ‘ओम नमः शिवाय’ मध्ये समर जयसिंग महाकाल बनले होते. भगवान शिवाच्या भूमिकेतील समर जयसिंग लोकांना इतके आवडले की वास्तविक जीवनातही लोक समर जयसिंग यांना भगवान शिव मानू लागले होते. समर जयसिंग यांनी “सम्राट अशोक”, ‘मृत्युंजय’, ‘रामायण आणि महाराजा रणजित सिंग’ यासह अनेक पौराणिक कार्यक्रमात काम केले असले तरी भगवान शिवाच्या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आजही लोक त्यांना या भूमिकामुळे ओळखतात.

मोहित रैना ( Mohit Raina)  –

‘देवों के देव महादेव’ या मालिकेत मोहित रैना शिवच्या भूमिकेत दिसला होता. आता मोहित हिंदी चित्रपटांसाठी काम करत आहे. या टीव्ही कार्यक्रमात सोनारिका भदौरियाने माता पार्वतीची भूमिका केली होती आणि मौनी रॉयने देवी सतीची भूमिका केली होती.

अरुण गोविल   (Arun Govil )

प्रभू रामाच्या भूमिकेसाठी अरुण गोविल यांनाही बहुतेक लोक ओळखतात. पण ‘शिव महिमा’ चित्रपटात त्यांनी भगवान शिवची भूमिका साकारली होती. शांतीलाल सोनी दिग्दर्शित ‘शिव महिमा’ हा चित्रपट 1992 साली आला होता.

यशोधन राणा ( Yashodhan Rana)  

टीव्ही अभिनेता यशोधन राणा ‘ओम नमः शिवाय’ या मालिकेत भगवान शिवची भूमिका साकारताना दिसला होता. या शोमध्ये पार्वतीच्या भूमिकेत दिसलेल्या गायत्री शास्त्रीसोबत त्यांनी नंतर लग्नगाठ बांधली.

दारा सिंग ( Dara Singh) 

‘रामायण’मध्ये नेहमी हनुमानाच्या भूमिकेत असणारा अभिनेता दारा सिंग यांनीही भगवान शिवची भूमिका साकारली आहे. 1974 मध्ये आलेल्या ‘हर हर महादेवा’ या चित्रपटात दारा सिंग यांनी भगवान शिवाची भूमिका साकारली होती.

हेही वाचा –

जेव्हा रागाच्या भरात सलमान खानने निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या अंगावर भिरकावली डायरी तेव्हा…

जेव्हा भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे बनली बंगाली बाला, तेव्हा तिला पाहून फॅन्स म्हणाले…

प्रेग्नन्सीच्या काळातही काजल अग्रवालने केला जिममध्ये व्यायाम, सोबतच दिल्या ‘या’ दिवसांमध्ये फिट राहण्याच्या टिप्स

हे देखील वाचा